Coronavirus : सातारा : कोरोनाचे दोन संशयीत दाखल; 'त्या' दोघांची प्रकृतीत सुधारणा

Coronavirus : सातारा : कोरोनाचे दोन संशयीत दाखल; 'त्या' दोघांची प्रकृतीत सुधारणा
Updated on

सातारा : कोरोनासदृष्य लक्षणे असलेल्या दोन संशयीतांना आज (बुधवार) उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुणे उपचारासाठी रासायीनिक प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.
 
कोरोना आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस राज्यात वाढत आहेत. पुण्यातही आज नवा रुग्ण सापडला. अशा परिस्थीती जिल्ह्यामध्ये अद्याप बाधीत रुग्ण सापडलेला नाही. दोन दिवसापूर्वी आबुधाबीवरून आलेल्या एका युवकाला लक्षणांवरून उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका सहा वर्षाच्या मुलीलाही तशीच लक्षणे असल्यामुळे दाखल केले. मात्र, युवकाचा परवा व मुलीचा काल तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये दोघांनाही कोरानाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाला काहीसे हायसे वाटले होते.
 
आज दिवसभरही कोरोनाचा कोणी संशयीत जिल्हा रुग्णालयात आला नव्हता. परंतु, सायंकाळी दोन युवकांना स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणांनी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा रुग्णालयांमध्ये त्यांची तपासणी करण्यात आली. कोरोना सदृष्य लक्षणे वाटत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांना उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्याचा निर्णय घेतला. उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुणे काढण्यात आले आहेत. ते नमुणे तपासणीला रासयनिक प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहेत.
उपचारसाठी दाखल करण्यात आलेल्यापैकी एक जण आबुधाबीवरून येथून आला आहे तर, दुसरा हा दुबईवरून आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे प्रशासन पुन्हा अलर्ट झाले आहे. दरम्यान, यापूर्वी दाखल झालेल्या व कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झालेल्या दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

हेही वाचा : Coronavirus : आता त्यांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी बंद

वाचा : कसे काय बुवा...त्यांचे 200 रुपयांवर भागते


सातारा : शारजाह (युएई) येथून प्रवास करुन आलेला सातारा जिल्ह्यातील 29 वर्षे युवकाला सर्दी व घसा दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात कोविड-19 या आजाराचा अनुमानित रुग्ण म्हणून 18 मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आले आहे. तसेच सौदी अरेबिया येथून प्रवास करुन आलेला एक 22 वर्षीय युवकाला सर्दी व ताप असल्याने जिल्हा रुग्णालयात कोविड-19 या आजाराचा अनुमानित रुग्ण म्हणून 18 मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आला आहे.  या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.  



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
Nipani flyover wall collapse
Eknath Shinde Stays Disqualification Order
Koyna Dam discharge latest update
Marathi News Esakal
www.esakal.com