Coronavirus : " त्या " आरोग्य कर्मचाऱ्याचाही रिपोर्टही आला; एक महिला दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदी नुसार महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद आणि पाचगणी नगरपरिषद तसेच दांडेघर, ताईघाट, अंजुमन, नंदनवन, मीठा इस्टेट, भिलार, भोसे, पांगारी, गुरेघर, बोंडारवाडी, अवकाळी, मेटगुताड, लिंगमळा, नाकिंदा, क्षेत्र महाबळेश्वर, मेटतळे, माचुतर, भेकवली, भालगी, मोळेश्वर, कासवंड, देवळी, तापोळा, खिंगर या ठिकाणी बाहेरुन आलेल्या व्यक्तिंना आज (साेमवार) दुपारी 12 पर्यंत सातारा जिल्हा साेडण्याचे आदेश केले हाेते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील टाेल नाक्यावर सकाळच्या प्रहरी वाहनांची गर्दी हाेती.

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात रविवारी विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या " त्या " आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. रविवारी पर्यंत अनुमानित म्हणून दाखल केलेले दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान दुबई येथून आलेल्या 45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रविवारी (ता. 23) रात्री उशिरा अनुमानित म्हणून रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी आज (साेमवार) सकाळी दिली.

बहामा,  दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेला 27 वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र वय 24 वर्षे त्या दोघांनाही सर्दी व खोकला असल्याने  21 मार्च रोजी रात्री 11 वाजता जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. 

कतार येथून प्रवास करुन आलेला 24 वर्षीय युवक त्याला घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री  1 वाजता विलगीकरण कक्षात दाखल केले होते. यापूर्वी चिली येथून आलेल्या 24 वर्षीय युवकास व  दुबई येथून आलेल्या 29 वर्षीय युवकास  दाखल करण्यात आले होते.
रविवारी एका आरोग्य कर्मचाऱ्याला काही लक्षणांमुळे अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. रविवारी रात्री दाखल केलेल्या या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन. आय. व्ही. कडे पाठवला आहे.

वाचा : कामाचं रोजचं रहाटगाडगं म्हणजे जिंदगी नसते राव

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदी नुसार महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद आणि पाचगणी नगरपरिषद तसेच दांडेघर, ताईघाट, अंजुमन, नंदनवन, मीठा इस्टेट, भिलार, भोसे, पांगारी, गुरेघर, बोंडारवाडी, अवकाळी, मेटगुताड, लिंगमळा, नाकिंदा, क्षेत्र महाबळेश्वर, मेटतळे, माचुतर, भेकवली, भालगी, मोळेश्वर, कासवंड, देवळी, तापोळा, खिंगर या ठिकाणी बाहेरुन आलेल्या व्यक्तिंना आज (साेमवार) दुपारी 12 पर्यंत सातारा जिल्हा साेडण्याचे आदेश केले हाेते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील टाेल नाक्यावर सकाळच्या प्रहरी वाहनांची गर्दी हाेती.

वाचा : जिल्हाधिकारी म्हणाले सातारकरांनाे तुमची साथ हवी आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Suspected Woman Patient In District Hospital Satara Admited