ब्रेकिंग- सांगलीत कोरोना पॉझिटीव्ह 9 : प्रशासन अधिक सर्तक....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅब चे अहवाल पॉझीटीव्ह आले होते.

सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅब चे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सांगली जिल्ह्यात आता कोरोना  रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे.  हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत . हे कुटुंब ज्या परिसरात राहतात .तो परीसर या आगोदरच प्रशासनाने सील केला आहे .

हेही वाचा- बापरे : गर्दी कशी महा गर्दी सांगलीत नियम धाब्यावर...

त्या परिसरात औषध फवारणी सह विशेष लक्ष देण्यात आले आहे .अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे

सांगली जिल्ह्यातील आणखी 5 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह..कोरोना पॉझिटिव रुग्णांची एकूण संख्या 9

डॉ संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronet Positive 9 in Sangli More Career in Administration sangli marathi news