बारा तासाच्या प्रयत्नाला आले अखेर यश; आईसाठी मिळाला बेड

बारा तासाच्या प्रयत्नाला आले अखेर यश; आईसाठी मिळाला बेड
Updated on

सांगली : कोरोनाचा विळखा जसा वाढत आहे, तशीच रुग्णांसाठी बेडची(covid Bed)गरजही वाढू लागली आहे. त्यामुळे आपल्या कोरानाबाधित आप्तास गाडीतून बेडचा शोध करत फिरण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. अशीच जिल्ह्याच्या एका टोकाकडे असलेल्या खेड्यातील दोन मुलांना आईसाठी बेड शोधण्यात तब्बल बारा तास लागले. नगरसेवक अभिजित भोसले यांनी रात्री प्रयत्न करुन एका हॉस्पिटलमध्ये (Hospital)बेड उपलब्ध करुन दिल्याने वृध्देवर उपचार सुरु झाले.

Corporator Abhijeet Bhosale assisted elderly woman two children wandering for twelve hours for bed sangli marathi news

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिवसाला रुग्णांची संख्या दोन हजाराहून अधिक होऊ लागली. प्रत्येक तालुक्‍यात रुग्णांचा आकडा रोज तीन अंकी होऊ लागला. अत्यवस्थ रुग्णास सरळ सांगली, मिरजेत आणावे लागत आहे. येथेही बेडची टंचाई होऊ लागल्याने बेड शोधण्यासाठी नातेवाईकांना पळापळ करावी लागत आहे. अशीच तब्बल १२ तास धावपळ एका खेड्यातील दोन भावांना आईसाठी करावी लागली. गाडीतून आईला घेऊन ते सांगली, मिरजेत बेडसाठी सकाळी नऊ वाजल्यापासून फिरत होते. सायंकाळच्या सुमारास पुष्पराज चौकात त्यांना पोलिसांनी अडवून चौकशी केली.

आईला ॲडमिट करण्यासाठी घेऊन जात असल्याचे समजल्यावर त्यांनी तेथूनच जाणारा इन्साफ फौंडेशनच्या कार्यकर्त्याशी त्यांची गाठ घालून दिली. त्याने नगरसेवक अभिजित भोसले यांना हा प्रकार सांगितल्यावर भोसलेंनी त्या वृध्देची चौकशी केली. त्यांना आधार दिला आणि उपाशीपोटी फिरणाऱ्या या तिघांनाही जेवणाची सोय करुन दिली. त्यानंतर विविध हॉस्पिटलना फोन करुन त्यांनी बेडची चौकशी केली. शेवटी घाटगे हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असल्याचे समजले. रात्री तेथे जाऊन वृध्देस ॲडमिट केले आणि त्यांच्यावर उपचार सुरु झाले. त्यामुळे मुलांचा जीव भांड्यात पडला.

कोरोनामुळे बेडचा आणि ऑक्‍सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे.दोनच दिवसांपुर्वी कुपवाडमधील एका हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा होता. त्यावेळीही राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या सहकार्याने हॉस्पिटलसाठी ऑक्‍सिजन उपलब्ध करुन दिल्याने 35 रुग्णांचे प्राण वाचले होते.

-अभिजित भोसले, नगरसेवक

Corporator Abhijeet Bhosale assisted elderly woman two children wandering for twelve hours for bed sangli marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com