
विटा : हत्तीगवत काढण्याच्या कारणावरून मला, पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करून काठीने मारहाण करणाऱ्या संपत बाबू शेळके, सुवर्णा संपत शेळके व धनाजी संपत शेळके या तिघांविरुद्ध शहाजी बाबू शेळके (वय ५८, सर्व बामणी, ता. खानापूर) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बामणी येथे सामाईक जमीन गट ७०७ मध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले.