Covid Impact: घुंगरांचा आवाज थांबला; ढोलकी वर नाचणारी बोटेही स्थिरावली

Covid Impact roar stopped fingers dancing on the drum also settled sangli marathi news
Covid Impact roar stopped fingers dancing on the drum also settled sangli marathi news

नवेखेड (सांगली) : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने गावा गावातील जत्रा यात्रा बंद झाल्याने घुंगरांचा आवाज थांबला आहे. ढोलकी वर नाचणारे बोटे स्थिरावली आहेत. तमाशातील अदाकारीला दाद देण्यासाठी हवेत उडणारे फेटे आता बंद झाले, निघणारे हास्याचे फवारे थांबले ,शिट्ट्या टाळ्या ऐकू येईनात या धंद्यातील दीडशे कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल थांबली आहे. पंधराहजारहुन अधिक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी याच कारणामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.दिवसेंदिवस कोरोना वाढू लागल्याने सार्वजनिक यात्रा समारंभ जत्रा, यात्रा यावर बंदी आली आहे .फेबुरुवारी ते मेच्या दरम्यान महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणात यात्रा भरतात .ग्रामदेवताची यात्रा म्हणजे लोकांच्या आनंदाचा उत्सव यामध्ये करमणुकीच्या कार्यक्रमाची मोठी रेलचेल असते. यामध्ये तमाशाला अनन्यसाधारण महत्व आहे.प्रत्येक यात्रेत तमाशा असतोच या तीन चार महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करून कलावन्त बिदागी मिळवितात. त्यावरच त्यांचा उदर निर्वंह चालतो.परंतु तमाशाच बंद झाल्याने या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.काहीजण मिळेल ते काम करून उपजीविका करत आहेत प्रत्येक मिनिटाला आपल्या विनोदाने हसविणार्या कलावंताच्या डोळ्यात मात्र पाणी आहे त्यांना हवी आहे आपल्या मदतीची गरज

चर्चेतील तमाशा फड
मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर ,पांडुरंग मुळे, विठाबाई नारायणगावकर,मालती इनामदार,तानाजी वाघिरीकर,कमल कराडकर,रेखा पाटील कोल्हापूरकर,महादेव मनवकर,सुदाम साठे

राज्यातील तमाशा फड
कराड केंद्र ३२ हंगामी
काळज केंद्र ३१ हंगामी
नारायणगाव ४० हंगामी
विटा केंद्र    १५ हंगामी 
नारायणगाव १५ तंबू फड 
खानदेश   १६ फड पूर्णवेळ
 खानदेश  ३ हंगामी फड 

राज्यातील तमाशा  कलावंताची अवस्था बिकट बनली आहे सरकारने त्यांची  जबाबदारी घ्यावी त्यांना आर्थिक मदत करावी तमाशा  महाराष्ट्राच्या लोककलेतील महत्वाचा घटक आहे 
संभाजी जाधव, अध्यक्ष पठ्ठे बापूराव मराठी लोकनाट्य परिषद 

तमाशे बंद झाल्याने आम्हा कलावंताची अवस्था बिकट बनली आहे सरकार बरोबर मायबाप रसिकांनीही आम्हाला मदत करावी
मंगला बनसोडे करवडीकर, तमाशा कलावंत 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com