बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मृत्यूचा आलेख वाढताच : १९ शिक्षकांचा घेतला कोरोनाने बळी

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मृत्यूचा आलेख वाढताच : १९ शिक्षकांचा घेतला कोरोनाने बळी
Updated on

बेळगाव : विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनाही (Teacher) कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात गतवर्षी २३ तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात २० शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर यावर्षी ७ मेपर्यंत बेळगाव (Belguam)जिल्ह्यात १९ शिक्षक कोरोनाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे ज्या शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपावर आधारित नोकरी देण्याची मागणी होऊ लागली आहे.

covid 19 teacher died update marathi news

‘विद्यागम’चा फटका

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, अनेक महिने शाळाही बंद आहेत. मात्र, शिक्षकांना विविध प्रकारची सरकारी कामे करावी लागत आहेत. २०२० मध्ये शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना विद्यागम अंतर्गत शिकविण्याची सूचना केली होती. त्यामुळे शिक्षकांना गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागले होते. मात्र, काही ठिकाणी विद्यागम योजनेमुळे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने योजना स्थगित केली. परंतु, शिक्षकांना शाळेतील अभ्यासाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. याच काळात अनेक शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. यापैकी काही शिक्षकांनी कोरोनावर मात केली. मात्र, जिल्ह्यातील ६२ शिक्षकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या शिक्षकांना रुग्णालयातील खर्च दिला जाईल. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपावर आधारित नोकरी दिली जाणार असल्याची माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. मात्र, अजूनही शिक्षकांनाही मदत मिळालेली नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या अधिकतर शिक्षकांना संसर्ग झाल्याची माहिती शिक्षकांतून दिली जात आहे.

ज्या शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना रुग्णालयातील खर्च मिळणार आहे. तसेच अनुकंपावर आधारित नोकरीही दिली जाणार आहे. शिक्षण खात्याने मृत्यू झालेल्या शिक्षकांची माहिती मागविली होती. त्यानुसार माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

-ए. बी पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी, बेळगाव

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात गेल्यावर्षी २० शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याबाबत माहिती देण्यात आली असून मृत शिक्षकांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दखल शिक्षण खाते घेत आहे.

-गजानन मण्णिकेरी,जिल्हा शिक्षणाधिकारी, चिक्कोडी

एक नजर

आतापर्यंत जिल्ह्यात ६२ शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये अधिक कोरोनाबळी.

शिक्षकांना रुग्णालयातील उपचाराचा खर्च मिळणार

शाळा बंद असल्या तरी सरकारी कामांचा बोजा अधिक

मृत्यू झालेले शिक्षक ४० ते ५० वयोगटातील

सध्या मृत्यू झालेल्या शिक्षकांची माहिती संकलित

करण्याचे काम सुरू

१ जानेवारी ते ७ मेपर्यंत मृत्यू झालेल्या शिक्षकांची संख्या

बेळगाव शैक्षणिक जिल्हा

बैलहोंगल ३

बेळगाव शहर ४

रामदुर्ग ३

चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा

अथणी ३

चिक्कोडी २

हुक्केरी ४

covid 19 teacher died update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com