कोरोनाच्या संकटावर पतसंस्था चळवळीने केली मात

The credit union movement overcame the Corona crisis
The credit union movement overcame the Corona crisis

नगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देशात लावण्यात आलेल्या लॉकडाउनने देशात मोठी आर्थिक आपत्ती आणली आहे. तथापि या आर्थिक आपत्तीवरही राज्यातील पतसंस्थांनी ऑनलाईन व घरपोच सेवांच्या नव्या आर्थिक प्रयोगांच्या बळावर मात करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीही वाढू लागलेल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदी जाहीर केल्यानंतर राज्यातील पतसंस्थांवर मोठे आर्थिक संकट आले होते. केंद्र व राज्य शासनाने पतसंस्था व मल्टीस्टेट पतसंस्थांना ऑनलाईन व अत्याधुनिक सेवा पुरविण्यास सांगितले. त्यावेळी बऱ्याच पतसंस्थांनी इंटरनेट बॅंकिंग, मिनी एटीएम आदी ऑनलाईन बॅंकिंगच्या सुविधा देण्यास सुरवात केली. नोटाबंदीच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मात केली. लॉकडाउन जाहीर झाल्यावर नागरिक घरातच थांबलेले असतानाही पतसंस्थांवर आर्थिक परिणाम न होता त्यांच्या ठेवी वाढत आहेत. 

लॉकडाउनच्या काळात पतसंस्थांनी सभासदांना दुरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले. पैसे लागत असले अथवा भरायचे असतील तर आम्हा सांगा. आमचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन ती सुविधा पुरवतील असे सांगितल्याने पतसंस्थांविषयीचा विश्‍वास ग्राहकांमध्ये आता वाढू लागला आहे. पतसंस्थांकडून ग्राहकांना घरपोच आर्थिक सेवा देण्यात येत आहेत. ग्राहकांना दुसऱ्या बॅंकांचे पैसे काढणे, आर्थिक मदत करणे, पतसंस्थेत भरणा करणे आदी कामांचा यात समावेश आहे. पतसंस्थांनी व मल्टीस्टेट पतसंस्थांनी लॉकडाउनच्या काळात सामाजिक कामेही मोठ्या प्रमाणात केली आहेत त्यामुळे पतसंस्थांची प्रतिमा उजळून निघाली आहे. 

लॉकडाउनमुळे पतसंस्थांना नागरिक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रोजचे कलेक्‍शन कमी होत असले तरी राष्ट्रीयीकृत बॅंकांतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना एटीएमपर्यंत जावे लागते मात्र काही मोठ्या पतसंस्थांकडे मिनी एटीएम आहेत. पतसंस्थांतील एक कर्मचारी ग्राहकाच्या घरी येऊन मिनी एटीएममध्ये कार्ड स्वॅप करून पैसे उपलब्ध करून देत आहे. शेअर मार्केट व म्युच्युअल फंडा ऐवजी नागरिक आता पतसंस्थांत ठेवी ठेवण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महिला बचत गटांनाही पतसंस्थाकडून मदत करण्यात येत आहे. 


राज्यातील पतसंस्थांचा समन्वय 
राज्यातील सर्व पतसंस्थांत समन्वय राहावा यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे हे दिवसातून दोन वेळा राज्यातील विविध पतसंस्थांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संपर्क साधत आहेत. गेली 20 दिवसांपासून रोज 80 पतसंस्थांशी कोयटे संपर्क साधून चर्चा करत आहेत. आतापर्यंत दीड हजार पतसंस्थांशी संपर्क साधला आहे. त्यांना ग्राहकाभिमूख सेवा पुरविण्यास सांगत आहेत. त्यामुळे या पतसंस्थांत समन्वय निर्माण झाला आहे. 

 
नोटाबंदीच्या आपत्तीला इष्टापत्तीत राज्यातील पतसंस्थांनी रुपांतर केलेले आहे. लॉकडाउनच्या काळात ऑनलाईनच्या माध्यमातून लोकाभिमूख अत्याधुनिक सेवा पुरविल्या जात आहेत. ग्राहकांची काळजीही पतसंस्था घेत आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होत असल्याने पतसंस्थांची प्रतिमा उजळून निघत आहे. कोरोना कर्ज योजना समता पतसंस्थेने सुरू केली आहे. त्याप्रमाणे सर्व पतसंस्था ही योजना सुरू करत आहेत. 
- काका कोयटे, अध्यक्ष 


नोटा बंदीनंतरचे कोरोना हे सर्वात मोठे आथिक संकट आहे. मात्र पतसंस्था चळवळ या संकटावर सहज मात करेल. पतसंस्था ग्रामीण भागात जास्त असल्याने शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम पतसंस्थांना पुढील काळात करावे लागणार आहे. 
- शिवाजीराव कपाळे, संस्थापक अध्यक्ष, साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्था 

 
राज्यात पतसंस्था 16 हजार 
जिल्ह्यात पतसंस्था 840 
देशात मल्टीस्टेट पतसंस्था 1500 
राज्यातील मल्टीस्टेट पतसंस्था 550 
जिल्ह्यात मल्टीस्टेट पतसंस्था 60

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com