नाग बाळगल्याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा...दुचाकी सोडून तिघे पळाले 

शिवाजीराव चौगुले 
Monday, 27 July 2020

शिराळा (सांगली)- पाडळी-औंढी-भटवाडी व ओझर्डे-सुरुल रस्त्यावर दोन नाग सापडल्याप्रकरणी शिराळा वनविभागाने तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी दिली. 

शिराळा (सांगली)- पाडळी-औंढी-भटवाडी व ओझर्डे-सुरुल रस्त्यावर दोन नाग सापडल्याप्रकरणी शिराळा वनविभागाने तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी दिली. 

ते म्हणाले,""शिराळा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पथक गस्त घालत असताना पाडळी-औंढी फाटा ते भटवाडी रस्त्यावर कदम मळा येथे पथकाला पाहून दोन अज्ञातांनी त्यांच्याकडील दुचाकी रस्त्यालगत सोडून ऊसाच्या शेतातून पळ काढला. दुचाकीची तपासणी केली असता मागील बाजूस प्लास्टिकच्या गोणीत नाग आढळला. सर्पमित्रांच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. दुचाकी जप्त केली आहे. 

वाळवा तालुक्‍यातील ओझर्ड- सुरुल रस्त्यावर मठ येथे सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) यांच्या गस्ती पथकाला पाहून अज्ञाताने त्याच्याकडील प्लास्टीक गोणी रस्त्यावर सोडून मोटारसायकलने पळ काढला. गोणीची तपासणी केली असता प्लॉस्टिकच्या बरणीत जिवंत नाग आढळला. पंचनामा करून नागास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. उपवनसंरक्षक पी. बी. धानके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक जी. आर. चव्हाण व वनक्षेत्रपाल सुशांत काळे तपास करीत आहेत. 

 

संपादन : घनशाम नवाथे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against three for carrying a snake . The three left the bike and fled

Tags
टॉपिकस
Topic Tags: