निमित्त फक्त वाढदिवसाचे ; पत्नीनेच काढला पतीचा काटा

crime case in balgam wife killed husband with her boyfriend in belgaum
crime case in balgam wife killed husband with her boyfriend in belgaum

खानापूर (बेळगाव) : जांबोटी (ता. खानापूर) येथील छायाचित्रकार विजय आवलक्की यांचा खून अनैतिक संबंधातील अडथळा दूर करण्याच्या हेतूने पत्नीनेच करवून आणल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी विजय यांची पत्नी सुबोधा (वय ४६) हिला अटक करण्यात आली. तिचे आणि प्रमुख संशयित रामचंद्र बाबूराव कांबळे (दोघेही रा. जांबोटी) यांच्यात अनैतिक संबंध होते. रामचंद्र यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत आहे. आता सुबोधाचीही रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.

याबाबतची अधिक माहिती अशी : २५ डिसेंबरला विजय यांचे नारायण ज्ञानेश्वर मेंडीलकर (वय २०, रा. कालमणी) याने वाढदिवसाची छायाचित्रे काढण्याच्या निमित्ताने अपहरण केले होते. त्यानंतर २७ ला त्यांचे शीर धडावेगळे करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. प्रमुख संशयित रामचंद्र याने सुबोधा व त्याच्यातील अनैतिक संबंधांची कबुली दिली होती. खुनात सहभाग असलेल्या सर्व संशयितांना अटक झाली होती. पण, सुबोधाला अटक झाली नव्हती. पोलिसांनी काल तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता रामचंद्रशी असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पतीच्या खुनाचा कट रचल्याचे तिने कबूल केले.

पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने विजय यांनी रामचंद्रला कामावरून काढून टाकले होते. पत्नी सुबोधा आणि रामचंद्र याने खुनाचा कट रचला. रामचंद्रने विजयला स्टुडिओतून थेट चिखलेला आणण्यास नारायण मेंडीलकरला सांगितले. तेथे जाण्यापूर्वी कालमणीजवळच्या एका ढाब्यावर रामचंद्र व्हॅनमध्ये चढल्याने विजय यांना संशय आला. पण, त्यांना बळजबरीने चिखलेला नेऊन त्यांचा खून करण्यात आला.

म्हणून मुलीकडून घेतली तक्रार...

सुरवातीपासून विजय यांच्या पत्नीने साळसूदपणाचा आव आणला होता. पण, रामचंद्रने आधीच तोंड उघडले. पोलिसांनीही तिच्याकडून तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांच्या मुलीकडून तक्रार घेतली. खुनासाठी नारायण आणि इतर तीन अल्पवयीन संशयितांना देण्यासाठीचे दहा हजार रुपये सुबोधानेच रामचंद्रला दिले होते, असे स्पष्ट झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com