भरदुपारी अवघ्या चाळीस मिनीटांत साधला डाव ; लाखोंचा ऐवज घेऊन भामटे पसार

crime case in belgaum crime and lakh rupees gold theft from thief
crime case in belgaum crime and lakh rupees gold theft from thief
Updated on

बेळगाव : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अवघ्या चाळीस मिनिटांत सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम मिळून सुमारे एक लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. दुपारी तीनच्या सुमारास न्यू वैभवनगरमध्ये ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी घरमालक शिवाजी मारुती भोसले यांनी एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसले हे ट्रकचालक असून त्यांचे न्यू वैभवनगरमध्ये घर आहे. ते सपत्नीक त्याठिकाणी वास्तव्यास आहेत. शुक्रवारी ते आपल्या ट्रकवर फास्टॅग बसवून घेण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडले होते. तर पत्नी दुपारी २.२० च्या सुमारास घराला कुलूप घालून त्याच परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. 
चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत गेटचा आणि घरच्या दर्शनी दरवाजा कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून त्यात ठेवलेले १५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण आणि वीस हजार रुपयांची रोख रक्‍कम लांबविली. चोरट्यांनी अवघ्या ४० मिनिटांत डाव साधला.


भोसले यांच्या पत्नी दुपारी तीनच्या सुमारास घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्‍वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्‍वान काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Marathi News Esakal
www.esakal.com