मुंबईच्या महिला वकिलाची 15 लाखांची फसवणूक; तोतया डॉक्टला अटक

या वकील महिलेने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली
मुंबईच्या महिला वकिलाची 15 लाखांची फसवणूक; तोतया डॉक्टला अटक
Updated on

विटा : ग्रामीण भागातल्या एका सोशल मीडियात ॲक्टिव्ह (social media) असणाऱ्या तरुणाने जर्मनीत डॉक्टर (germany) असल्याचे भासवून एका वकील महिलेला तब्बल १५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी वैभव सुरेश शिंदे (वय २९, रा. लेंगरे, ता. खानापूर) यास विटा पोलिसांनी अटक केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी ः गेल्या वर्षी मेमध्ये कोरोनाच्या (corona) संकटामुळे जगभरात लॉकडाउन (lockdown) होते. त्यामुळे घरबसल्या लेंगरे येथील वैभव शिंदे यानेही फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर भरत जाधव या नावाने खोटे अकाउंट (fake account) काढले. प्रोफाईलवर एका मॉडेल तरुणाचा फोटो लावला होता. दरम्यान, मुंबईतील एका वकील महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

वैभवने त्याच्या प्रोफाईलमध्ये तो जर्मनीत वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे खोटे लिहिले होते. त्यामुळे या वकील महिलेने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. कधी हिंदी, कधी मराठीत संभाषण होऊ लागले. वैभवने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आपला मोबाईल नंबर महिला वकिलाला दिला व महिलेचा नंबरही मिळवला. मग व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही या दोघांचे चॅटिंग सुरू झाले. मेसेजेस, फोन कॉल करून आणखी विश्वास व भावनिक नाते संपादन केले.

मुंबईच्या महिला वकिलाची 15 लाखांची फसवणूक; तोतया डॉक्टला अटक
मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना मिळणार संधी?

या काळात वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिला वकिलाकडून वैभव शिंदे याने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तब्बल १४ लाख ९२ हजार रुपये घेतले. ही रक्कम घेताना त्याने आपली आई कोरोनाने आजारी आहे, वडील आजारी आहेत, चुलते वारले, बहिणीचा नवरा सीरियस आहे, जर्मनीहून भारतात येताना समस्या आल्या, पाकीट मारले गेले. त्यात क्रेडिट कार्डस, डेबिट कार्डस होती. तिकडे आल्यावर बँक ट्रान्स्फर करतो, अशा भूलथापा दिल्या. या सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटल्याने आपण पैसे दिले, असे संबंधित महिला वकिलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

वैभव शिंदे याने ७ जूनला अचानक समाजमाध्यमाची आपली भारत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंटस डीॲक्टिव्हेट केली. त्यानंतर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र, पेशाने वकील असल्याने स्वतःला सावरत त्यांनी महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. संबंधित भरत जाधव ऊर्फ वैभव शिंदे याचा मोबाईल नंबर दिला. त्यावरून तो नंबर सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावातील वैभव शिंदे याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तत्काळ या वकील महिलेने विटा पोलिस ठाण्यात संपर्क साधला आणि पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. दोघांतील संभाषणाचे आणि वैभव शिंदे याला वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैभव शिंदे याला अटकही करण्यात आली. ही घटना समजताच परिसरात खळबळ उडाली.

मुंबईच्या महिला वकिलाची 15 लाखांची फसवणूक; तोतया डॉक्टला अटक
तेरी मेहरबानियॉं तेरी कदरदानिया! हिंगणगावचा 'रॉकी' वेधतोय लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com