सांगली : कृष्णा नदीपात्रात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

crime case in sangli lady drawn in river and dead
crime case in sangli lady drawn in river and dead
Updated on

सांगली : येथील कृष्णा नदीपात्रात स्वामी समर्थ घाटाजवळ एका
अनोळखी महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आज सकाळी आढळला. महिलेची ओळख पटली नसून घाटाजवळच तिचे कपडे आणि साहित्य आढळले आहे. याबाबत सांगली शहर पोलिस तपास करत आहेत. 

आज सकाळी नऊच्या सुमारास घाटाजवळ महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यामुळे सकाळी या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. मृत महिला विवस्त्र अवस्थेत होती. तसेच बाजूलाच तिची कपडे व साहित्य होते. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घाटाकडे धाव घेतली. गर्दी
हटवली. मृतदेहाचा पंचनामा करून महिलेच्या वस्तू ताब्यात घेतल्या. महिलेची ओळख पटली नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिला आंघोळीसाठी गेल्यानंतर
बुडून मृत झाली असावी असा अंदाज आहे. दरम्यान महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा रंगली होती. पोलिस मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gold Smuggling
Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
Marathi News Esakal
www.esakal.com