सांगली : कुरुंदवाडीत वाळू उपसा करताना जेसीबी, ट्रॅक्टर पकडला; तहसीलदारांची धाड

crime case in sangli sand robbery karandwadi in sangli
crime case in sangli sand robbery karandwadi in sangli
Updated on: 

झरे (सांगली) : कुरुंदवाडी (ता. आटपाडी) येथे वाळू उपसा करीत असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांना मिळाली. अशी माहिती मिळताच तात्काळ तहसीलदार व त्यांच्या टीमने परिसरातील ओढापात्रात धाड टाकली. त्यामध्ये जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये वाळू भरीत असताना ट्रॅक्टर व जेसीबीला जागेवरच पकडले आहे. अनेक दिवसांपासून या परिसरात दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू आहे. यावरून अनेक वेळा तक्रारी झाल्या आहेत. मात्र या प्रकरणात एकमेकांना बघून घेण्याची भाषा बोलली जात आहे.

वाळू उपसामुळे ओढा पात्रात अनेक मोठ खड्डे पडले आहेत. संपूर्ण पात्रातील वाळू उपसा केल्याने बदल झाला आहे. सततच्या वाळू उपसामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी ओढापात्रात थांबत नाही. परिणामी दुष्काळाला सामोरे जावे लागते. परंतू आज तहसीलदार सचिन मुळीक यांना वाळू उपसा होत असलेली माहिती मिळताच त्यांनी महसूल विभागाच्या टीमसह तिथे धाड टाकली. यामध्ये जेसीबी व ट्रॅक्टर सापडला आहे. धाड टाकत असताना नायब तहसीलदार राजकुमार राठोड, तलाठी रविंद्र कांबळे, कोतवाल संजय माने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti's aggressive demand to give first installment of Rs 4,500
Break Fail Baija Purchased for ₹61 Lakh in Athani
Ujwala Tingre MPSC Achievement Inspires Rural Students as Daughter of Labourer Mother and Shepherd Father Becomes Officer
Shambhuraj Desai Koyna dam water dispute