बेळगाव : विषारी सर्प दंशाने महिलेचा मृत्यू, ढोणेवाडीतील घटना

crime cases in belgaum one lady dead snake stinger
crime cases in belgaum one lady dead snake stinger
Updated on

कारदगा (बेळगाव) : ढोणेवाडी येथील महिलेला शेतात काम करत असताना विषारी सर्पाने दंश केला होता. तिला सांगलीच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी (१) रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. अनिता बाबासाहेब सादळकर (वय ५६) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबावर आभाळ कोसळले असून गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अनिता सादळकर या शनिवारी (२०) पठार परिसरातील स्वतःच्या शेतात काही महिला मजुरांना घेवून ऊस भांगलणीसाठी गेल्या होत्या. उसाच्या सरीत बसून तण काढताना पाठीमागून विषारी सपाने दंश केला. काहीतरी टोचले म्हणून हातातील खुरपे मागे फिरवले. पण पुन्हा सापाने दंश केला. मागे फिरून पाहिले तर सर्प होता. तातडीने अनिता सादळकर यांनी सर्पदंशाची माहिती घरात सांगितल्यावर सांगली सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे बारा दिवस उपचार केले. पण विष किडनीतील रक्तात मिसळल्याने उपचारास प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व तहसीलदारांनी  शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून सादळकर कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

ढोणेवाडी परिसरातून हळहळ

अनिता सादळकर या अत्यंत कष्टाळु महिला होत्या. त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सादळकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे ढोणेवाडी गावासह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com