crime cases in belgaum sankeshwar accident of one young person and he dead
crime cases in belgaum sankeshwar accident of one young person and he dead

बेळगाव : धावत्या बसमधून उडी टाकून युवकाची आत्महत्या

Published on

संकेश्वर (बेळगाव) : धावत्या बसमधून उडी टाकून निपाणी तालुक्यातील हंचिनाळ (के. एस‌.)  येथील युवकाने आत्महत्या केली. राष्ट्रीय महामार्गावर गोटुर गावानजीक शुक्रवारी (२) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोपिनाथ जोतिराम जनवाडे (वय 27) असे मयताचे नाव आहे. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, गोपिनाथ जोतिराम जनवाडे हा मानसिक रुग्ण होता. त्याच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू होते. वडील जोतिराम जनवाडे हे त्याला तिकडे घेऊन गेले होते. बेळगावहून निपाणीकडे येणाऱ्या बसमध्ये (केए 31 एफ 2403) ते बसले होते. बस आज शुक्रवारी (2) दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान गोटुर नजीक येताच गोपीनाथ याने अचानक दरवाजा उघडून रस्त्यावर उडी टाकली. यावेळी मागून बेळगावहून निपाणीकडे येणाऱ्या बसच्या (केए २३ एफ १०३८) पाठीमागील चाकात तो सापडला. यामध्ये त्याच्या डोक्यासह पायाला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी संकेश्वर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. संकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत संकेश्वर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com