esakal | व्यवसायातील मंदीमुळे सुवर्ण कारागीराची ॲसिड पिवून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime

नासिरउद्दीन हा मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणार असून तो होसुर बसवान गल्ली शहापूर येथे भाड्याने राहत होता.

व्यवसायातील मंदीमुळे सुवर्ण कारागीराची ॲसिड पिवून आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लॉकडाउनमुळे व्यवसायात मंदी आल्याने निराश बनलेल्या सुवर्णकाराने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी वापरण्यात येणारे ॲसिड प्राशन करुन आत्महत्या केली. नासीरउद्दीन येनलहक्क मंडल (वय ४२, मूळ रा. पश्चिम बंगाल व सध्या रा. होसूर बसवाण गल्ली, शहापूर) असे मयताचे नाव आहे. बुधवारी (ता. ८) रात्री ही घटना घडली असून घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा: गणरायाबद्दल 'या' काही खास गोष्टी तुम्हांला माहितीयेत का?

नासिरउद्दीन हा मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणार असून तो होसुर बसवान गल्ली शहापूर येथे भाड्याने राहत होता. त्याने दाणे गल्ली शहापूर येथे एन. एस. ज्वेलरी नावाने दुकान सुरू केले होते. मात्र, लॉकडाउनमुळे व्यवसाय करणे कठीण बनले होते. तसेच त्यांच्या दुकानात १८ कामगार काम करत होते. त्यामुळे त्यांचा पगार देणेही कठीण बनल्याने तो मानसिक व सअस्वस्थ बनला होता. त्यातूनच काल रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने ओल्ड पी.बी रोडवरील बल्लारी नाल्यानजिक जाऊन आपल्या कामगारांना फोन केला. व आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. काही वेळातच कामगारानी त्या ठिकाणी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

हेही वाचा: Photo: छगन भुजबळांचा भाजी विक्रेत्यापासून आत्तापर्यंतचा प्रवास

loading image
go to top