esakal | अँटिजेनचा बनवाट अहवाल देणारा गजाआड; गुन्हे अन्वेषणची धडक कारवाई

बोलून बातमी शोधा

अँटिजेनचा बनवाट अहवाल देणारा गजाआड; गुन्हे अन्वेषणची धडक कारवाई
अँटिजेनचा बनवाट अहवाल देणारा गजाआड; गुन्हे अन्वेषणची धडक कारवाई
sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : रॅपिड अँटिजेनच स्वॅब तपासणीचा (rapid antigen swab test) बनावट निगेटिव्ह अहवाल देणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने (Local crime investigation) गजाआड केले. स्वप्नील सुरेश बनसोडे (वय २५, रा. ढवळी, ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. तो मिरजेतील (Miraj) सिनर्जी हॉस्पिटलमध्ये (Sinergy Hospital Sangli) माहिती तंत्रज्ञान विभागात काम करतो. त्याच्याकडून दोन बोगस रिपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याकडून आणखी काही माहिती उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस अधीक्षक (Miraj Police) दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत (Press conference) दिली.

दरम्यान, बोगस रिपोर्ट देणाऱ्यास अटक केल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. असे अनेक रिपोर्ट ई-पाससाठी (E-pass)वापरत असल्याचेही तापसात पुढे आले आहे. अधिक माहिती अशी, कोरोना (Covid -19) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसऱ्या बाजूला ई-पास सह अत्यावश्‍यक सेवेसाठी कोरोना तपासणीचा अहवाल गरजेचा आहे. या फायदा घेत सिनर्जी हॉस्पिटलमधील एक कर्मचारी बोगस अहवाल देत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास (LCB Comittee) मिळाली. त्यानुसार बोगस (Fraud) ग्राहक पाठविण्यात आले. स्वॅब न घेता निगेटिव्ह अहवालासाठी (Negative Report) हजार रूपये लागतील असे सांगण्यात आले. त्यानुसार आधार क्रमांक घेवून सायंकाळी लगेच बोगस रिपोर्ट देताना एलसीबीच्या पथकाने स्वप्नील बनसोडे यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन बोगस रिपोर्ट जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: जयंतराव, 'कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळू नका; कुरघोडीचे राजकारण थांबवा!'

ई-पाससह अत्यावश्‍यक सेवांसाठी हे रिपोर्ट वापरले जात असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. पोलिसांनी चार दिवसांची पोलिस कोठडी (Police Arrested) सुनावली असून अधिक तपास केला जात आहे. अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक निरीक्षक रवीराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, दिलीप ढेरे, जितेंद्र जाधव, सुधीर गोरे, मुद्दसर पाथरवट, प्रशांत माळी, अजय बेंदरे, आर्यन देशिंगकर, बजरंज शिरतोडे, स्वप्नील नायकोडे यांचा कारवाईत सहभाग होता.

हेही वाचा: पाटील, मुश्रीफ गटाचे लीड; 16 पैकी 14 उमेदवार आघाडीवर