
सुमारे शंभरहुन अधिक लोकांच्या जमावात ही मारहाण झाली. यात तिघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
शिरोढण (सांगली) : बोरगांव (ता. कवठेमहांकाळ) येथे उपसरपंच निवडी दरम्यान दोन गटांत झालेल्या हणामारीत एका सदस्याचा मृत्यू झाला. पांडुरंग जनार्दन काळे (वय 58, रा. बोरगाव) असे मृत सदस्याचे नाव आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुमारे शंभरहुन अधिक लोकांच्या जमावात ही मारहाण झाली. यात तिघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
हेही वाचा - सर्व कारभाऱ्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न ; विविध समित्यांवर वीस जण
दरम्यान, मृत काळे हे भाजपचे सदस्य आहे. सदस्य फुटल्याच्या वादातून ही मारामारी झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. उपसरपंच नामदेव पाटील यांनी महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. तिथे उपसरपंच पद रिक्त होते. बोरगाव ग्रामपंचायतीत 12 सदस्य आहेत. सरपंच निवड थेट जनतेमधून करण्यात आली होती. त्यापैकी 2 राष्ट्रवादीचे आणि 9 भाजपचे सदस्य होते. सरपंच हे माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक गटाचे होते. भाजपचे नामदेव पाटील यांनी उपसरपंच पदाचा महिन्यापूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर आज उपसरपंच निवडीसाठी दोन गट ग्रामपंचायत समोर आमने सामने आले. त्यावेळी दोन्ही गटात सदस्य फुटीवरून काठीने जोरदार हणामारी झाली. यावेळी पांडुरंग काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीन जखमी झाले.
संपादन - स्नेहल कदम