
बेळगाव : पोलिसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात मलप्रभा नदीत उडी घेतल्याने दोन जुगाऱ्यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. ७) सायंकाळी रामदुर्गमध्ये ही घटना घडली. अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. समीर अहंमदसाब बटकुर्की (वय २२, रा. रामदुर्ग) व मंजुनाथ लक्ष्मण बंडीवड्डर (२८, रा. किल्ला तोरगल) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रामदुर्गजवळील पडकोट क्रॉसनजिकच्या हिंदू स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात जुगार रंगला होता. याची माहिती मिळताच रामदुर्ग पोलिसांनी सायंकाळी सहाच्या सुमारास सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याची तयारी केली. मात्र, जुगाऱ्यांनी अड्ड्यापासून काही अंतरावर आपल्या दोन खबऱ्यांना तैनात
केले होते.
पोलिसांची फौज जुगार अड्ड्याकडे येत असल्याचे पाहताच खबऱ्यांनी जुगाऱ्यांना इशारा मिळाला. त्यामुळे, अड्ड्यावर जमलेल्या ३० ते ३५ जुगाऱ्यांनी वाट फुटेल तिकडे धाव घेतली. त्यापैकी सहाजणांनी जवळच असलेल्या नदीपात्रात उड्या टाकल्या. चौघे पोहत सुखरुपपणे पलीकडे गेले. मात्र, दोघे अर्ध्यावरच नदीत बुडाले.
पोहून बाहेर पडलेल्या चौघांनी दोघे बुडाल्याची माहिती इतरांना दिली. पोलिसांनाही याबाबत समजले. त्यामुळे, रात्रीपासूनच पाण्यात बुडालेल्या दोघांचा शोध सुरु करण्यात आला. रामदुर्ग पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानानी मृतदेह बाहेर काढले. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी नदी पात्र ओलांडताना दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करुन घेतली आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.