
दारुच्या नशेत मित्रावरच कोयत्याने हल्ला
बेळगाव : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीतून एकाने दारुच्या नशेत आपल्या मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. शनिवारी (ता. २६) सायंकाळी संभाजी उद्यान येथे ही घटना घडली. जखमीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळच्या दरम्यान मद्यप्राशन केलेल्या दोघा मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वादावादी झाली.
वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर एकाने मित्रावरच कोयत्याने वार केला. त्यामुळे तो जखमी झाल्याने लागलीच काहींनी त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे अधिक तपशील मिळू शकला नाही.
Web Title: Crime News Alcohol Drunken Friend Attack On Friend Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..