बेळगाव : बेकायदेशीररित्या पोपट बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

शौकतली अब्दुल नाईक असे संशयिताचे नाव असून बुधवार (ता.१) सीआयडी वनखात्याने ही कारवाई केली
crime news case of carrying bird One arrested for illegal possession of parrots belgaum
crime news case of carrying bird One arrested for illegal possession of parrots belgaumsakal

बेळगाव : बेकायदेशीररित्या पोपट बाळगल्याप्रकरणी खानापूर तालुक्यातील जांबोटी येथून एकाला अटक केली आहे. शौकतली अब्दुल नाईक असे संशयिताचे नाव असून बुधवार (ता.१) सीआयडी वनखात्याने ही कारवाई केली आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे शौकतअलीने आपल्या मालकीच्या सलीम या नावाने असलेल्या चिकन दुकानात तीन जिवंत पोपट बाळगले आहेत. अशी माहिती सीआयडी वन खात्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांना मिळाली होती.

त्यामुळे त्यानी आपल्या सहकाऱ्यांसह काल सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी वरील संशयिताला अटक करून त्याने पाळलेले हिरव्या रंगाचे तीन जिवंत पोपट जप्त केले. त्याच्यावर वन्यजीवी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊन संशयीताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. सीआयडी वन अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे वन्यप्राणी व पक्षी बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com