Belgaum News : माजी नगरसेवकासह पाच जण बेळगावातून तडीपार

एकाच दिवशी पाच जणांना तडीपार करण्यात आल्याने अवैध धंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले
crime news Five people including former corporator from Belgaum
crime news Five people including former corporator from Belgaumesakal

बेळगाव : मटका, जुगार, गांजा बेकायदा दारू विक्री आदी अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह पाच जणांना गुरुवार (ता.८) बेळगावतून तडीपार करण्यात आले आहे. असा आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी बजावला आहे. एकाच दिवशी पाच जणांना तडीपार करण्यात आल्याने अवैध धंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. मार्केट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोहम्मदशफी मोदीनसाब ताशीलदार (वय ६८, रा. खंजर गल्ली) आणि इजारअहमद महंमदइसाक नेसरीकर (वय ४८ रा. खंजर गल्ली) माळमारुती पोलिसांच्या कार्यक्षेत्रातून जॉनी जयपाल लोंढे (वय ३६, रा.गॅंगवाडी) भौरगौडा जोतिबा पाटील (वय ४५, रा. पाटील गल्ली कनबर्गी, आणि शहापूर पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून नितीन पांडुरंग पेडणेकर उर्फ पेरणकर (वय ५०, रा. खडेबाजार शहापूर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शहर उपनगर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस खात्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक वेळा विविध प्रकरणात अटक झाली तरी अनेक वरील पाच जण अवैद्य कारवायात सक्रिय होते. त्यामुळे त्यांना तडीपार करण्यात यावे, असे प्रस्ताव मार्केट, माळमारुती आणि शहापूर पोलीसस्थानकाच्या निरीक्षकांनी मार्केटचे सहायक पोलीस आयुक्त नारायण बरमनी यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर एसीपी श्री. बरमनी यांनी ही यादी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांना पाठवली.

त्यामुळे वरील पाच जणांना त्यांनी तडीपार करण्याचा आदेश आज बजावला आहे. पाच जणांना बल्लारी, कोप्पळ आणि विजयनगर जिल्ह्यात तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तनी एकाच दिवशी पाच जणांना तडीपार केल्याचा आदेश बजावल्याने अवैध धंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी देखील त्यांनी काही जणांना बेळगावातून तडीपार केले आहे.

तडीपारचा हा निर्णय म्हणजे बेकायदा धंद्यात गुंतलेल्यासाठी एक इशाराच म्हणावा लागेल. मटका, जुगार, गांजा आदी अवैध धंद्यात सक्रिय असलेल्यांची नावे नागरिकांनी नजीकच्या पोलिस स्थानकात कळवावीत, असे आवाहन देखील पोलीस उपायुक्त श्री. गडादी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com