esakal | मिरज : शोधनिबंधाचे विनापरवाना पुनर्मुद्रण केल्याप्रकरणी प्राध्यापक, प्रकाशकावर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

मिरज : शोधनिबंधाचे विनापरवाना पुनर्मुद्रण केल्याप्रकरणी प्राध्यापक, प्रकाशकावर गुन्हा

मिरज  - शोधनिबंधाचे विनापरवाना आपल्या नावे पुनर्मुद्रण केल्याप्रकरणी मिरज महाविद्यालयातील प्रा. बबन शंकर सातपुते ( रा. मिरज )यांच्यावर गुन्हा दाखल झाला. प्राचार्य. डाॅ. चंद्रशेखर तुकाराम कारंडे ( वय 60, रा. स्फुर्ती चाैक, विश्रामबाग, सांगली ) यांनी गांधी चाैक पोलिसात तक्रार दिली.

मिरज : शोधनिबंधाचे विनापरवाना पुनर्मुद्रण केल्याप्रकरणी प्राध्यापक, प्रकाशकावर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज  - शोधनिबंधाचे विनापरवाना आपल्या नावे पुनर्मुद्रण केल्याप्रकरणी मिरज महाविद्यालयातील प्रा. बबन शंकर सातपुते ( रा. मिरज )यांच्यावर गुन्हा दाखल झाला. प्राचार्य. डाॅ. चंद्रशेखर तुकाराम कारंडे ( वय 60, रा. स्फुर्ती चाैक, विश्रामबाग, सांगली ) यांनी गांधी चाैक पोलिसात तक्रार दिली.

प्रा. सातपुते हे मिरज महाविद्यालयात हिंदी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. तीन वर्षांपुर्वी महाविद्यालयात हिंदी विषयाची कार्यशाळा झाली होती. नंतर महाविद्यालयाने सांगलीतील ज्ञानदीप प्रकाशनमार्फत त्याची कार्यपुस्तिका प्रसिद्ध केली होती. डाॅ. श्रीमती शाहीन जमादार संपादक होत्या.

जुलै 2017 मध्ये प्रा. सातपुते यांनी या पुस्तिकेतील काही मजकुरात बदल करुन पुनर्मुद्रण केले, त्याच्या दहा प्रती ज्ञानदीप प्रकाशनामार्फतच छापल्या. त्यासाठी प्राचार्यांची परवानगी घेतली नाही. प्रकाशक म्हणून प्राचार्य डाॅ. कारंडे यांचे नाव घातले, पण त्यासाठीही त्यांची परवानगी घेतली नाही. स्वतःचे नाव सहसंपादक म्हणून छापले.  यासंदर्भात पोलिसांनी प्रा. सातपुते व ज्ञानदीप प्रकाशनाच्या राजमती पाटील ( सह्याद्रीनगर, सांगली ) यांच्याविरुद्ध काॅपीराईट कायद्यानुसार गुन्हे नोंदवले. 

loading image
go to top