नगर : "राष्ट्रवादी' झुंजली; तीस जणांविरुद्ध गुन्हा

youth.jpg
youth.jpg
Updated on: 

नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यानंतर नंदनवन लॉनच्या गेटवर माजी महापौर अभिषेक कळमकर व शहर उपजिल्हध्यक्ष बाबा गाडळकर यांच्यासह तीस पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपापसात झुंज केल्याच्या आरोपावरून कोतवाली ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, बाबा गाडळकर, संतोष लांडे, वैभव वाघ, सुरेश बनसोडे, तौसिफ शेख, संतोष ढाकणे, माजी महापौर अभिषेक कळमकर, किरण काळे, जॉय लोखंडे यांच्यासह तीस जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

दरम्यान, काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मेळावा नंदनवन लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. मेळावा संपल्यानंतर नेते मंडळी निघून गेली. त्याच वेळी माजी महापौर अभिषेक कळमकर आणि आमदार जगताप समर्थकांमध्ये किरकोळ शाब्दिक वादावादी झाली. त्यात एकाने चप्पल भिरकावल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून कळमकर यांना बाजूला घेतले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे नाट्य सुरू होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटांमध्ये पोलिस ठाण्यातच समेट झाला. फिर्याद न देता सर्वजण निघून गेले. 
दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी तीस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

""मेळावा संपल्यानंतर काल दुपारी वरील लोक आपापसात भांडण करून शिवीगाळ दमदाटी करताना आढळून आले. पोलिसांसमोर आपापसात झुंज केली,'' असे पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे यांनी फिर्यादीत म्हटले. वरील कार्यकर्त्यांविरुद्ध मारहाण, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, दंगा करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दमदाटी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक विकास वाघ करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com