गुन्हेगार निलेश सुतार सांगली जिल्ह्यातून तडीपार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

निंभोरे म्हणाले, की गुन्हेगार निलेश सुतार विरुद्ध खून, घातक हत्याराने दुखापत करून जखमी करणे, धमकावणे, शिविगाळ करणे, अल्पवयीन मुलीचे अपहरण आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आष्टा (सांगली) - आष्टा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश नागेश सुतार (वय 29, रा. सुतार गल्ली, आष्टा) याला एका वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी ही माहिती दिली. 

निंभोरे म्हणाले, की गुन्हेगार निलेश सुतार विरुद्ध खून, घातक हत्याराने दुखापत करून जखमी करणे, धमकावणे, शिविगाळ करणे, अल्पवयीन मुलीचे अपहरण आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटकेची तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. तो राहत असलेल्या भागात त्याची दहशत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणी सामान्य नागरिक तक्रार देण्यास धजावत नव्हता.

त्याची गुन्हेगारी वृत्ती, हालचालीमुळे लोकांच्या जीवितास व मालमत्तेला धोका होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डूबुले, पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेशच्या तडीपारीचा प्रस्ताव इस्लामपूर विभाग दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असून त्यानुसार 23 ऑगस्टपासून निलेशला सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal deportation in sangli district