
Sangli : जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास योजना परिसरात गुन्हेगाराचा एडक्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. भर दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली. सौरभ बापू कांबळे (वय २४) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून त्याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.