अबब ! शिरोळ तालुक्यात शेतात सापडली साडेआठ फुट लांबीची मगर (व्हिडिओ)

अनिल केरीपाळे
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

कुरुंदवाड - तेरवाड (ता. शिरोळ) येथील शेतात साडेआठ फूट लांबीची मगर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तासभराच्या प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश आले. पकडलेली मगरी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

कुरुंदवाड - तेरवाड (ता. शिरोळ) येथील शेतात साडेआठ फूट लांबीची मगर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तासभराच्या प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश आले. पकडलेली मगरी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णा पंचगंगेच्या महापूराचे पाणी शिरोळ तालुक्यातील अनेक गावात शिरले. या पुराच्या पाण्यातून साप, मगर यासारखे जलचर प्राणी वाहून आले आहेत. पूर ओसरल्यानंतर आता सर्वत्र त्यांचे दर्शन घडत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

महापूराच्या कालावधीत कुरुंदवाड शिरढोण मार्गावरील लांडगे मळ्यानजीक तीन पिल्लासह मगर दिसली होती. पूर ओसरल्यानंतर मगर पाण्याच्या दिशेने गेली. आज तेरवाड येथे नागरी वस्तीपासूनजवळच अजस्र मगर आज सापडली. संजय गुदले यांना त्यांच्या शेताच्या परीसरात कांहीतरी सरपटत गेल्याच्या खूणा दिसल्या. त्यांनी याची पाहणी केली असता त्यांना भलीमोठी चिखलाने माखलेली मगर उसाच्या शेतात दिसली. आण्णाप्पा बंडगर, सिकंदर कोठीवाले, बल्लू मुल्ला, वैभव माळी, अक्षय पाटील, अमोल खोत, आयुब मुल्ला, प्रताप ढापळे, रमजान जमादार, अमोल कुमठाळे, रावसाहेब माळी, यांनी धाडसाने या मगरीला जेरबंद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crocodile about eight and a half feet long found in a field in Shirola taluka