अंकलखोप पुलाजवळ मगरीचे दर्शन 

crocodile.jpg
crocodile.jpg

अंकलखोप (जि. सांगली)-  भिलवडी (ता. पलूस) अंकलखोप दरम्यानच्या पुलाजवळ आज (ता. 2) शांत वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या डोहात मगरीचा विहार अनेकांनी अनुभवला.

दररोज मासेमारी साठी पुलावर, पुलाखाली हौशी व व्यावसायिक मच्छीमार वावरत असतात. त्याना मगरीचे नित्य दर्शन होते. औदुंबर ते भिलवडी, अंकलखोप दरम्यान नदीत अनेकदा मगरीचा वावर दिसला आहे. अगदी बोटीपासून जवळून जाणारी मगर अनेक भाविक व ग्रामस्थांनी पाहिली आहे. आता तर मगरीचा वावर बिनधास्त सुरु आहे. कृष्णा नदीत बाहेर गावचे नागरिक श्रद्धेने अंघोळ करतात. स्थानिक तरुण, मुले पुलावरून उड्या मारतात. घाटावरून नदीत पोहण्यासाठी या काठावरून त्या काठावर जातात. पण आता मात्र हे नदीत उतरणे जीवावर बेतणारे ठरु शकते अनेक दिवसांपासून कृष्णा नदीच्या पात्रात असणाऱ्या मगरी धोकादायक ठरू लागल्या आहेत. अनेक जणांनी आपला जीव गमवला आहे. 

वन विभागाने पाणवठ्यावर फलक लावून जबाबदारी (सोपस्कार )पार पाडली. आता हे फलक गंज पकडले आहेत. काही दिवस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी नेमून सरकार दरबारी जनतेला सुरक्षा दिल्याचे दाखवून दिले. मात्र काही दिवसांनी पुन्हा ये रे माझ्या मागल्या झाले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com