
सांगली : झाडावरून ‘ती’ दबक्या पावलांनी खाली येते... हळूच कुंपणाआड दडून राहते. तिचं लक्ष त्याच कुंपण कट्ट्यावर ठेवलेल्या प्लेटकडे असते. फास्टफूड खाऊन ठेवलेल्या त्या प्लेटमध्ये शिल्लक राहिलेला टोमॅटो सॉस, ग्लासमधील शिल्लक लस्सी, आदी पदार्थ फस्त करते. हळूच पुन्हा झाडावर निघून जाते. पुन्हा वाट पाहते, नवी रिकामी प्लेट कट्ट्यावर दिसण्याची.