esakal | जयश्री पाटील यांची मनधरणी सुरु; आज कुठे होणार बैठक वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

crongressmen trying to persue Jayashritai Patil's mind; today there will be meeting in Mumbai

राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांना परावृत्त करण्यासाठी कॉंग्रेसकडून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे.

जयश्री पाटील यांची मनधरणी सुरु; आज कुठे होणार बैठक वाचा...

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांना परावृत्त करण्यासाठी कॉंग्रेसकडून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. युवा नेते विशाल पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उद्या (बुधवारी) मुंबईत बैठक होणार आहे. 

कॉंग्रेसचे नेते मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही जयश्री पाटील यांना राष्ट्रवादी प्रवेशापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. याबाबत त्यांनी आज मुंबईत प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहे थोरात यांच्या निवासस्थानी उद्या (बुधवारी) दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. यासाठी जयश्री पाटील, डॉ. सिकंदर जमादार, नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह अनेक कायकर्ते, पदाधिकारी जाणार आहेत. 

श्रीमती पाटील यांनी आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, महापालिकेचे नगरसेवक यांच्याशी चर्चा केली. यावेळी काही कायकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आज युवा नेते विशाल पाटील यांनीही विजय बंगला येथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या निर्णयावर त्यांनी पुनर्विचार करावा. कॉंग्रेसमधून बाहेर पडू नये असे मत मांडल्याचे समजते. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही त्यांची भेट घेऊन कॉंग्रेसमध्येच थांबण्याबाबत विनंती केली. 

चार महिन्यांपुर्वीच चर्चा 
कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून दखल घेतली जात नसल्याने गेले काही श्रीमती जयश्री पाटील महिने नाराज आहेत. चार महिन्यापुर्वीच त्या राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे मिरजेत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या कार्यक्रमासाठी आले असताना त्यांचीही भेट श्रीमती पाटील यांनी घेतली होती. या कार्यक्रमास कॉंग्रेसचे अनेक नेते असतानाही त्या कार्यक्रमास गेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या काळात ही चर्चा थांबली होती. आता गेले दोन दिवस पुन्हा जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.