जत पूर्व भागातील पिके खराब; शेतकऱ्यांचे नुकसान 

Crop crops in the eastern part of Jat; Losses to farmers
Crop crops in the eastern part of Jat; Losses to farmers
Updated on

संख : दुष्काळी जत तालुक्‍यात गेल्या महिन्यात जत व पूर्व भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतांत साचलेल्या पाण्यामुळे पिके खराब होत आहेत. 

तालुक्‍यात यंदा संख मध्यम प्रकल्प व ओढे-नाले बंधारे बहुतांश तलाव भरलेत. मध्यंतरी म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या पाण्यापासून वंचित 42 गावांना तुबची बबलेश्वर योजनेचे गाजर दाखवण्यात आले. महाराष्ट्र व कर्नाटकातील पाणी करार होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. तूर्तास म्हैसाळ योजनेच्या वंचित 42 गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या वर्षी झालेल्या पावसाने तरी मिटवला आहे. 

जत तालुक्‍यातील पूर्व भागातील शेतकरी दरवर्षी टॅंकरने विकत पाणी घेऊन डाळिंब द्राक्ष बागा जगवल्या होत्या. यंदा पूर्वभागातील संख, माडग्याळ, उमदी परिसरात तब्बल 10 वर्षानंतर दमदार व जोरदार पाऊस झाला. ओढे-नाले बंधारे, संख मध्यम प्रकल्प भरून वाहत आहेत. पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे संख मध्यम प्रकल्पाचे भिवर्गीकडे उजवा कालव्यातून जाणारे पाण्याची गळती होऊन 12 शेतकऱ्यांच्या शेतांत पाणी साचून 10 लाखांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांनी जलसंपदाकडे दाद मागितली आहे. 

जत पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी कायम संघर्ष करावा लागतो. म्हैसाळच्या सहाव्या टप्प्याच्या लाभापासून येथील 42 गावांना वगळल्यामुळे राजकारण्यांनी तुबची-बबलेश्वर या कर्नाटक राज्यातील पाणी योजनेचा पर्याय समोर आणला. 

अद्याप दोन्ही राज्यांत करार होऊ शकला नाही. यंदा पावसामुळे दिलासा मिळाला तरी, शेतमालाचे उत्पादनात मात्र घट होणार आहे. मशागतीचा खर्चही निघणार नाही. उलट कर्जाचा डोंगर वाढणार आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Koyna Dam water level July 2026
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com