
जत : जत तालुक्यातील पश्चिम भागात पीक पाहणीमध्ये ऊस पिकाऐवजी द्राक्षाची नोंद करण्यावरून एका महिला कोतवालास लाकूड, दगडाने मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. काल दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत महिला कोतवालाने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित दादासो आकाराम लवटे, लता दादासो लवटे व राजश्री तुकाराम लवटे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नसून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.