सोनेरी टोळीचा खेळ : या तालुक्‍यात कार्यारंभ आदेशाआधीच कोट्यावधीची कामे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

मिरज-कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच करण्यात आलेले विजयनगर येथील 6 लाख 10 हजार रुपयांचे मुरमीकरणाचे काम रद्द झाल्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी हा दणका दिला आहे. ठेकेदारांची एक टोळी बांधकाम विभागाला हाताशी धरून करत असलेला खेळ यानिमित्ताने उघडा पडला आहे. असा गोरखधंदा करणाऱ्यांना इशारा असला तरी टोळीचा आता कायमचा बंदोबस्त गरजेचा आहे. 

मिरज-कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच करण्यात आलेले विजयनगर येथील 6 लाख 10 हजार रुपयांचे मुरमीकरणाचे काम रद्द झाल्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी हा दणका दिला आहे. ठेकेदारांची एक टोळी बांधकाम विभागाला हाताशी धरून करत असलेला खेळ यानिमित्ताने उघडा पडला आहे. असा गोरखधंदा करणाऱ्यांना इशारा असला तरी टोळीचा आता कायमचा बंदोबस्त गरजेचा आहे. 

विजयनगरमधील सहा लाख 10 हजार रुपयांचे काम एक उदाहरण आहे. याआधी अनेक कामे अशी दडपून करण्यात आली आहे. कामाची थेट निविदा होण्याआधी कामे पूर्ण होतात. ठेकेदार नेमतो कोण, पैसे येतात कुठून, काम होते कसे, तपासणी न करता बिले निघतात कशी, हा साराच संशोधनाचा विषय आहे. ही साखळी पोसली गेलीय ती वरिष्ठांच्या सहकार्याने आणि स्थानिक नेत्यांच्या वरदहस्ताने. सारेच वाटेकरी असल्याने अनेक गावांत हे प्रकार घडले आहे. 
मिरज पंचायत समिती मासिक सभेत या विषयांचा बोभाटा झाल्यामुळे काही काम रद्द करण्यात आली होती. तरीही मिरज पंचायत समितीमधील बांधकामच्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या टोळीने काम पुन्हा एकदा बोगस पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न केला. तो आता श्री. गुडेवार यांच्या धाडसी कारवायांमुळे उघडकीस आला आहे.

विजयनगर येथील रद्द करण्यात आलेले काम म्हणजे मिरज पंचायत समितीमधील बांधकाम विभागाच्या बोगस गिरीतील हिमनगाचे एक टोक आहे. गेल्या चार वर्षात मिरज पंचायत समितीमधील बांधकाम विभागात झालेल्या सर्वच कामांची चौकशी केली तर कोट्यावधी रुपयांची बोगस कामे समोर येतील. मिरज पंचायत समिती मासिक सभांमध्ये अनेक वेळा बोगसगिरीबाबत सदस्यांनी अत्यंत आक्रमकपणे पंचनामा केला. अनिल आमटवणे, काकासाहेब धामणे, कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, अशोक मोहिते यासह अनेक सदस्यांनी गैरकारभाराची लक्तरे वेशीवर टांगली.

गुडेवार यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना चकवा देण्याचे धाडस आजही होते आहे. ढवळी, सलगरेसह अनेक गावांतील वादग्रस्त बांधकामांबाबत सर्वच पंचायत समिती सदस्यांनी आवाज उठवलाय. जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांमधील साटेलोट्यामुळेच ही सर्व प्रकरणे बेदखल झाली. अलीकडे अधिकारी आणि ठेकेदारांच्या सोनेरी टोळीच्या लुटमारीमुळे तालुक्‍यातील सार्वजनिक कामांची वाट लागली आहे. ज्याचा सर्वाधिक त्रास पंचायत समिती सदस्यांना होतो आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crores of works have already been started in this taluka before the commencement of work order