क्रूर नियतीचा घाला...जुळ्या भावंडांचा नाला बांधमध्ये बुडून मृत्यू...आटपाडी तालुक्‍यातील दुर्दैवी घटना 

नागेश गायकवाड
Friday, 11 September 2020

आटपाडी (सांगली)-  "ते' दोघे जुळे सख्खे भाऊ. एकाच वर्गात चौथीमध्ये शिकत होते. दोघेही कबड्डी खेळात तरबेज. दोघांचा दिवस एकाच वेळी उजाडायचा. रोजचं दोघांचं एकत्र खेळणं, बागडणं आणि काम करणं चाललेलं असायचं. गुरुवारी (ता.10) दुपारी बाळेवाडी येथे मेंढ्या घेऊन दोघेही चारण्यासाठी गेले होते. दुर्दैवाने माळावरील पाणी साठलेल्या नाला बांध मध्ये दोघांचाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. दोघांनीही जन्मल्यानंतर एकाचवेळी पहिला श्‍वास घेतला होता. तसेच शेवटचा श्वास देखील एकाच वेळी घेतला. "लव' आणि "अंकुश' या दोघा भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

बाळेवाडी (ता. आटपाडी) येथील हैबतराव कोळेकर यांना जुळी मुले होती. एकाच वेळी दोघांचा जन्म झाल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी रामायणातील जोडी प्रमाणे "लव' आणि "अंकुश' अशी त्यांची नावे ठेवली होती. दोघेही सध्या चौथीला गेले होते. कबड्डीमध्ये दोघे आघाडीचे खेळाडू होते. दोघांचा दिवस एकत्रच सुरू व्हायचा. दिवसभरात एकत्र खेळणं, बागडणं आणि काम करणं नित्याचे चाललेलं असायचं. दोघांचा दिवसही एकत्र मावळत होता. दोघांची चांगलीच नावाप्रमाणे जोडी जमली होती.

गुरुवारी दुपारी बाळेवाडीत माळावर मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. या माळावर माती नाला बांध जागोजागी आहेत. गेल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे. मेंढ्या चरत आणि खेळत-खेळत तलावाच्या पाण्यात एक जण बुडाला. पाण्याचा अंदाज लागला नाही. पाय गाळात रुतत चालला. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा गेला आणि बघता बघता दोघेही एकाच वेळी पाण्यात बुडाले. पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. जन्माला एकत्र आलेल्या दोघांना काळाने एकाचवेळी ओढून नेले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. साऱ्या गावाचे लक्ष वेधून घेणारी लव-अंकुश जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे साऱ्या गावावर मोठी शोककळा पसरली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cruel destiny. Twin siblings drown in Nala dam. Unfortunate incident in Atpadi taluka