वीज मीटर रिडींग पाठवण्यास ग्राहकांना आता पाच दिवसांची मुदत 

MSEB READING.jpg
MSEB READING.jpg

सांगली-  महावितरणकडून प्रत्येक महिन्यात निश्‍चित तारखेला वीज ग्राहकांचे मीटर रिडींग घेण्यात येते. ग्राहकांना देखील स्वत:हून रिडींग पाठवण्याची सुविधा दिली आहे. यापूर्वी ग्राहकांना रिडींग पाठवण्यासाठी 24 तासांची असलेली मुदत आता पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढवण्यात आली आहे. स्वतःहून रिडींग पाठवल्यास विविध फायद्यांसह बिलाची पडताळणी शक्‍य असल्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीम) सुरु करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेपर्यंत एका निश्‍चित तारखेला ग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येते. रिडिंगसाठी निश्‍चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद असते. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रिडींगच्या निश्‍चित तारखेच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची "एसएमएस' द्वारे दरमहा विनंती करण्यात येते. त्यानंतर पाच दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ऍप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठवता येईल. पूर्वी केवळ मीटर रिडींग न होऊ शकल्याने ग्राहकांना मेसेज पाठवले जात होते. रिडींगसाठी 24 तासांची मुदत होती. आता दरमहा रिडींग पाठवण्यास पाच दिवसांची मुदत दिली आहे. ग्राहकांनी मीटरचे केडब्लूएच (kWh) रिडींग व त्यानुसार रिडींगचा फोटो पाठवल्यास महावितरणऐवजी ग्राहकांनी पाठवलेल्या रिडींगनुसार बिल तयार केले जाईल. 

मीटर रिडींग पाठवण्यासाठी महावितरण मोबाईल ऍप डाऊनलोड करणे व मोबाईल क्रमांक ग्राहक क्रमांकासोबत नोंदणीकृत आवश्‍यक आहे. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार "मॅन्यूअली रिडींग' ऍपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल ऍपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग "सबमीट' करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करायचे आहे, त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com