esakal | एसी, फ्रीज, टीव्ही खरेदीत ग्राहकांना मोजावे लागणार जादा पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

Sangali

एसी, फ्रीज, टीव्ही खरेदीत ग्राहकांना मोजावे लागणार जादा पैसे

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : कच्च्या मालाची कमी उपलब्धता आणि आयात करात वाढ झाल्यामुळे एप्रिल २०२१ पासून टीव्ही (TV), फ्रीज (Fridge) आणि एसीच्या (AC) किमती पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. उत्पादनाची निर्मिती भारतात होत असली तरी कॉम्प्रेसर (Compressor), एलईडी (LED) पॅनलसारखे महत्त्वपूर्ण सुटे भाग चीनकडून (China) पुरवले जातात. जीएसटीमध्ये (GST) वाढ नसली, तरी प्रत्यक्षात फ्रीजच्या कॉम्प्रेसर पुरवठ्याची अडचण झाली आहे. परिणामी दरवाढीचा ग्राहकांना झटका बसतो आहे.

कॉम्प्रेसर चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. भारतामध्ये बहुतांश फ्रीज कंपन्यांचे कारखाने आहेत. त्यामुळे बाजारपेठेला पुरवठ्याची अडचण येईल, अशी शक्‍यता नव्हती. मात्र कॉम्प्रेसरच्या पुरवठ्याअभावी फ्रीजच्या किमती दीड ते दोन हजारांनी वाढल्या आहेत. एलईडी टीव्हीचे पॅनेल चीनमधून आयात होतात. त्याची जोडणी भारतात होते. २०१६-१७ पासून कमी झालेल्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. ३२ इंच एलईटी टीव्हीचे दर सहा महिन्यांत सुमारे ४ ते ५ हजारांनी वाढले आहेत

हेही वाचा: बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित हे नियम, खिशावर होणार थेट परिणाम

‘‘सरासरी ३ ते ५ टक्के दरवाढ झाली आहे. कॉपर, स्टीलच्या भावात वाढ झाली आहे. त्याचा हा परिणाम आहे. आयात कर वाढीचाही फटका आहे.’’

सतीश मालू, श्री. इलेक्‍ट्रॉनिक, सांगली

loading image
go to top