esakal | आटपाडी तालुक्‍यासाठी "टेंभू'चे आवर्तन 15 पासून 

बोलून बातमी शोधा

The cycle of "Tembhu" for Atpadi taluka from 15th

टेंभू योजनेच्या पाण्याचे उन्हाळी आवर्तन 15 एप्रिलपासून तालुक्‍यात सुरू केले जाणार आहे. त्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे.

आटपाडी तालुक्‍यासाठी "टेंभू'चे आवर्तन 15 पासून 

sakal_logo
By
नागेश गायकवाड

आटपाडी : टेंभू योजनेच्या पाण्याचे उन्हाळी आवर्तन 15 एप्रिलपासून तालुक्‍यात सुरू केले जाणार आहे. त्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे. यावर्षी आटपाडी तालुक्‍यात तब्बल पाच महिने पाऊस कोसळत होता. सहा महिने बहुतांश सर्वच ओढे वाहत होते. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई अपवाद वगळता जाणवत नाही. 

अतिवृष्टीने पिके वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकांची लागवड केली. यामध्ये मका, भुईमूग आणि भाजीपाला या पिकांचे मोठे क्षेत्र आहे. तसेच अतिवृष्टीने वाया गेलेल्या बागा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात धरल्या आहेत. त्यामुळे पाण्याची गरज वाढणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आटपाडी पाटबंधारे विभागाने टेंभूचे उन्हाळी आवर्तन 15 एप्रिल पासून सुरू करण्याचे नियोजन केले आहे. 

सध्या माहुली पंप गृहातील दोन पंप सुरू केले असून घाणंद तलावात पाणी आले आहे. 15 एप्रिल पासून खरसुंडी कालवा सुरू केला जाणार आहे. या कालव्यावर दोन मागण्या नोंदवल्या आहेत. उन्हाळी आवर्तनाचे नियोजन सुरू केले आहे. कालव्यावरील गळती काढणे आणि दुरुस्ती चालू केली आहे. तसेच नियोजनासाठी शेतकऱ्यांच्या सोबत बैठक का सुरू केली आहेत. पाण्याची मागणी नोंदवावी, असे आव्हान शाखा पाटबंधारे विभागाने केले आहे. 

पाणी मागणी नोंदीचे आवाहन... 
आटपाडी तालुक्‍यात टेंभूच्या पाण्याची चार कोटी थकबाकी आहे. त्याची वसुली पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे. सध्या दोन ठिकाणी पाण्याची मागणी आली आहे. नियोजनासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागण्याची नोंदणी पाटबंधारे विभागाकडे करावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता महेश पाटील यांनी केले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार