चक्रीवादळाच्या तडाख्याने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त 3000 पक्षांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyclone Damage poultry farm 3000 birds dead Navekhed

चक्रीवादळाच्या तडाख्याने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त 3000 पक्षांचा मृत्यू

नवेखेड : चक्रीवादळाच्या तडाख्याने बोरगाव तालुका वाळवा येथील विकास व प्रकाश पाखले या बंधूंचे पोल्ट्री फार्म जमीनदोस्त झाला 3000 पक्षांचा यामध्ये मृत्यू झाला सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाले. वाळवा तालुक्याला दोन दोन दिवसापूर्वी वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला यामध्ये शेती पिकांबरोबरच लोकांचे अन्य नुकसान मोठ्या प्रमाणात झाले बोरगाव नवेखेड रस्त्यावर पाखलें वस्ती आहे.

या ठिकाणी पाखलें कुटुंबीयांचे सात ते आठ पोल्ट्री शेड आहेत पैकी विकास व प्रकाश पाखलें या बंधूंचे 35 फूट रुंद व दोनशे फूट लांबीचे पोल्ट्री शेड आहे सुमारे दहा हजार पक्ष्यांची ही पोल्ट्री आहे चक्रीवादळ अचानक या पोल्ट्री शेड मध्ये घुसल्याने वाऱ्याचा वेग मोठा असल्याने सिमेंटचे पिलर चिरले कैच्या व पत्रे ढासळले कोंबड्यांच्या अंगावर पडले यामध्ये सुमारे तीन हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला ही घटना झाल्यानंतर लगेच पाखले बंधूनी काही लोकांच्या मदतीने उर्वरित पक्षांना सुरक्षित स्थळी हलवले निसर्गाच्या या मोठ्याआपत्तीचा फटका या बंधूंना बसला आहे मोठ्या कष्टाने वाढवलेला व्यवसाय काही कळायच्या आत होत्याचा नव्हता झाला जवळपास 35 लाख रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे.

आमच्या पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान या चक्री वादळाने झाले.पंचनामेहोऊन तात्काळ मदत मिळावी.

- विकास ,प्रकाश पाखलें पोल्ट्री व्यवसायिक बोरगाव

Web Title: Cyclone Damage Poultry Farm 3000 Birds Dead Navekhed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..