दाभोलकरना उद्या ऑनलाईन अभिवादन करणार... "अंनिस' तर्फे आयोजन 

dr. dabholkar.jpg
dr. dabholkar.jpg

इस्लामपूर(सांगली) - महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉक्‍टर नरेंद्र दाभोळकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 20 ऑगस्ट रोजी ऑनलाइन अभिवादन कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली. 

ते म्हणाले,""शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 20 ऑगस्टला सात वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून तपास सीबीआयकडे गेला. देशातील पाच तपासयंत्रणा कार्यरत आहेत, तरीही डॉ. खूनाचे ठोस पुरावे मिळवण्यास व सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास यंत्रणा अपयशी ठरत आहेत. तपासातील दिरंगाईबाबत न्यायालयाने ताशेरे ओढलेत. या पार्श्वभूमीवर महा अंनिस तपास योग्य दिशेने व गतीने व्हावा याची आग्रही मागणी करीत आहे.'' 

ते म्हणाले,""मागील वर्षापर्यंत संघटनेच्यावतीने "जबाब दो' सारखे देशव्यापी आंदोलन झाले. यावर्षी "सूत्रधार कौन?' हे अभियान राबवले जात आहे. covid-19 च्या पार्श्वभूमीवर अभिवादन कार्यक्रम, सभा, निषेध सर्व ऑनलाईन पद्धतीने करणार आहोत. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासातील दिरंगाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी ऑनलाइन पिटीशन करणार आहोत. पोलीस सूत्रधारापर्यंत पोहोचत नाही, याचा निषेध करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते, समविचारी संस्था व व्यक्ती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदने पाठवली जाणार आहेत. जनमताचा संघटित अविष्कार व्यक्त होण्याच्या हेतूने तपास त्वरित व्हावा यासाठी हजारो ई-मेल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत.'' 

20 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी साडेसात वाजता कार्यकर्ते घरीच शहीद डॉ. दाभोळकर यांना अभिवादन करतील. साडेपाच ते साडेसात या वेळेत महा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह अभिवादन कार्यक्रम आहे. ज्येष्ठ संपादक व नामवंत लेखक गिरीश कुबेर मार्गदर्शन करणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर प्रमुख पाहुणे आहेत. चर्चेत कविता लंकेश(बेंगलोर), विजय कलबुर्गी (धारवाड), प्रा. मेघा पानसरे (कोल्हापूर), ऍड. मनीषा महाजन (पुणे) हे सामील होणार आहेत. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com