The dairy has an arbitrary role in sangli savlaj marathi news
The dairy has an arbitrary role in sangli savlaj marathi news

शेतकर्यांच्या दुधाच्या मापात कोण करतंय पाप ?

Published on

सावळज (सांगली) - ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक संलग्न व्यवसाय आहे. सरकारकडून दुग्धव्यवसाय चालना देण्यासाठी विविध योजनांचा डिंगोरा पिटण्यात येतो. परंतु दूध विकत घेणाऱ्या दूध संस्था व दूध संकलन केंद्रावर सरकारचे व प्रशासनाचे कसलेच नियंत्रण नसल्याने दुग्धसंस्थाचा मनमानी कारभार चालू आहे. दूधसंस्था दुधाची फॅट व वजनाची काटामारी करून शेतकऱ्यांची कोट्यवधींची लुबाडणूक करीत आहेत. ही लुबाडणूक थांबविण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांतून आहे.

दुधाचे फॅट व वजनाची काटामारी करून लुबाडणूक

तालुक्‍यातील ६९ गावांत सहकारी व खासगी दूधसंस्था व  संकलन केंद्राचे मोठे जाळे आहे. या संस्थामध्ये शेतकरी दूध घालतात. एका शेतकऱ्याने भागातील ९ गावांतील ४२ विविध दूध संकलन केंद्रात दुधाची फॅट व वजन तपासले असता मोठी तफावत आढळून आली. यावरून दूध संकलन केंद्राकडून शेतकऱ्यांची होणारी मोठी फसवणूक समोर आली आहे.

संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष 

शेतकरी दूध व फॅट वाढीसाठी जनावरांना महागडा चारा, पौष्टिक खुराक, औषधे घालतात. साहजिकच दूध उत्पादन खर्च वाढतो. परंतु संकलन केंद्रांनी फॅट व वजन मशीनमध्ये छेडछाड केल्यामुळे पाच लिटर मागे अर्धा लिटर तर १ ते २ फॅटची तफावत आहे. तालुक्‍यात सर्व दूध संकलन केंद्रातून होणाऱ्या भ्रष्टाचारातून शेतकऱ्यांच्या घामाच्या कोट्यवधी रुपयांवर दैनंदिन राजरोस डल्ला मारला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादन परवडेना झाले आहे. काही दूधसंकलन केंद्रे शेतकऱ्यांना म्हैस, गाय, खरेदीसाठी  पन्नास हजार ते एक लाखा पर्यंत रक्कम आगाऊ पैसे देतात. 

फिरत्या तपासणी पथकाची मागणी  

उचलीमध्ये घातलेल्या दुधाचे मनमानी करीत फॅट व वजन मारले जाते. सर्व बाजूनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. या दूधसंघ व संकलन केंद्रावर संबंधित प्रशासनाचे कसलेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. सर्वच सहकारी, खासगी दूध संकलन केंद्र समिती स्थापन करून त्यावर समितीचे थेट नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. तसेच शासनाने फिरते पथक नेमून वारंवार संकलन केंद्राच्या तपासण्या कराव्यात.

बहुतांश दूध संकलन केंद्रे दुधाचे वजन व फॅट मारतात. यातून शेतकऱ्यांची मोठी लुबाडणूक होते. प्रशासनाच्या कसलेच नियंत्रणअभावी संकलन केंद्रे राजरोस लूट करतात. याकडे गांभीर्याने पहात फसवणूक करणाऱ्यांवर  संबंधित विभागाने कायदेशीर कारवाई करावी.
- अनिल शिंदे, दूध उत्पादक शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com