मळेगाव येथे बंधारा पाडून नुकसान

बाबासाहेब शिंदे 
रविवार, 17 जून 2018

पांगरी : पाणी आडवा पाणी जिरवा हे उद्दीष्ट ठेवून शासन ग्रामीण भागातील ओढ्यावर बंधारे बांधत आहे. मात्र, मळेगाव (ता.बार्शी) येथे सिमेंटचा बांधलेल्या बंधाऱ्याची मुख्य भिंत तिघांजणांनी पाडून त्यामध्ये पाणी साठा होऊ नये म्हणून नुकसान केल्याची घटना ता.8 ते 10 जूनच्या सांयकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. ऋषी अविनाश इंगोले, जरीचंद विठोबा इंगोले, जहांगिर कोतवाल (रा. सर्व मळेगाव)असे गुन्हा नोंद झालेल्या व्यक्तीचे नावे आहेत. 

याबाबत जिल्हा परिषद उपविभागीय जलसंधारण अधिकारी
 मच्छिंद्र मारूती सोनवणे (रा.बार्शी) पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. जलसंधारण उपविभागामार्फत ग्रामीण भागातील ओढ्यावर व नदीवर बंधारे व पाझर तलावाच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा आदी कामे केली जातात. त्याप्रमाणे सन 2015-16 मध्ये मळेगाव येथील शेतकरी जहांगिर कोतवाल व ऋषी अविनाश इंगोले यांचे गट नं.461 मधील ओढ्यावर सिमेंटचा बंधारा क्र 4 बांधून तयार करण्यात आला. त्यामुळे आजूबाजूच्या शेतीला पाणीपुरवठा करणारे विहीरीतील पाण्याची पातळी वाढली होती. मात्र या बंधार्याची भिंत ऋषी अविनाश इंगोले, जरीचंद विठोबा इंगोले, जहांगिर कोतवाल (रा.मळेगाव)यांनी बंधार्यात पाणी साठा होऊ नये या उद्देशाने बंधार्याची मुख्य भिंत पाडून नुकसान केले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस पांडूरंग मुंढे करत आहेत.

Web Title: Damage to the dam at Malegaon