
सलगरे : मोकाट गायींच्या कळपाने बेळंकीतील निर्यातक्षम द्राक्षबागेचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. बेळंकी येथील उमेश गुंडा खोत यांच्या द्राक्षबागेत रात्रीच्या वेळी शिरकाव करून अंदाजे १५० मोकाट गायींच्या कळपाने निर्यातक्षम झालेल्या द्राक्षाची नासधूस करून लाखो रुपयांचे नुकसान केले.