परतीचा पाऊस शेतीच्या मुळावर : सांगलीत डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपाला पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

गेल्या पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपले आहे. दुष्काळी पट्टयात पावसाने दाणदाण उडवून दिली.

सांगली : जिल्ह्यात गेली चार दिवस सुरु असलेल्या परतीच्या पावसाने कहरच केला आहे. 10 ते 12 तीन दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडला. मंगळवारी हलका आणि आज बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार
सुरु आहे. संततधार सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे-नाले पुन्हा वाहते झाले आहेत. डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

गेल्या पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपले आहे. दुष्काळी पट्टयात पावसाने दाणदाण उडवून दिली. वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसाने 500 हेक्‍टरवरील ऊस आडवा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका 519 हेक्‍टर,डाळिंब 950 हेक्‍टर, ज्वारी 90 हेक्‍टर, भाताचे 30 हेक्‍टरचे नुकसान झाले
आहे. आजच्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीत भर पडणार आहे.या शिवाय सोयाबीन, केळी, भूईमुग, उडीद, बाजरी यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने परतीचा पाऊस शेतीच्या मुळावर असल्याचे स्पष्ट झाले.
द्राक्ष बागांच्या कटींगच्या कामांवरही पावसाचा परिणाम झाला.
प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.

हेही वाचा- कोल्हापुरात पश्‍चिम भागात अतिवृष्टी : शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज, सर्तकतेचा इशारा -

जिल्ह्यात सकाळी आठवाजेपर्यंतच्या 24 तासात तालुकानिहाय पडलेला पाऊस असा-

मिरज-15 मिलिमिटर, शिराळा-14 मिलिमिटर, विटा- 9 मिलिमिटर, अन्य सर्वतालुक्‍यात 5 ते 7 मिलिमिटर पाऊस पडला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to vegetable crops including pomegranate grape  banana in Sangli