
गेल्या दोन वर्षात झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. ओढे, नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. परिसरात बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यावर्षी ऊस, गहू यासह अन्य पिके जोमाने डोलत आहेत.
पेड : गेल्या दोन वर्षात झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. ओढे, नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. परिसरात बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यावर्षी ऊस, गहू यासह अन्य पिके जोमाने डोलत आहेत.
जलयुक्त शिवार, पाणी आडवा, पाणी जिरवा कार्यक्रम यातून कापूर ओढ्यावर बंधारे बांधले गेले. ते तुडुंब भरले. दोन वर्षांपासून गाव टॅंकरमुक्त झाले. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्याची समस्या येते. ती यंदा आली नाही. पेड तलावापासून ते हजारवाडीपर्यंत जवळपास 16 ते 17 लहान मोठे बंधारे बांधले आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे.
सलग दोन वर्षे दमदार पावसाने पेडचा तलाव भरून ओसंडून वाहता झाला. सर्व बंधारे तुडुंब भरले. मुबलक प्रमाणात पाणी आले. विहिरी आणि कुपनलिकांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. गहू, हरभरा, ऊस तसेच अन्य पिकांच्या बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी नवीन द्राक्षबागांच्या लागण केली आहे. ओढा पात्रात अजूनही वाहते पाणी आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार