' सकाळ ' मधुरांगण'तर्फे फलटणमध्ये दांडिया स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

 मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉ; विजेत्यांना आकर्षक बक्षिसे.

फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.
 
फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे स्पर्धेस सुरवात होणार आहे. या स्पर्धेत महिलानांच सहभाग नोंदविता येणार आहे. यात सोलो डान्स, ग्रुप डान्स व वैयक्तिक डान्स प्रकारात घागर फुंकणे नृत्य आदी प्रकारांचा समावेश आहे. या वेळी ग्रुपसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या ग्रुपला आकर्षक करंडक मिळणार आहे. या व्यतिरिक्त बेस्ट ड्रेपरी, बेस्ट ज्वेलरी, बेस्ट दांडिया, बेस्ट लुक व बेस्ट क्विन या प्रकारातही प्रथम व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
 
या स्पर्धेतील मुख्य आकर्षण मेगा लकी ड्रॉचे राहणार आहे. या ड्रॉमध्ये केवळ मधुरांगण सदस्यांनाच सहभागी होता येणार आहे. यातील विजेत्या मधुरांगण सदस्यास आकर्षक राजा-राणी कपाट मिळणार आहे. या स्पर्धेसाठी स्वरा स्टील फर्निचर, शिवपार्वती होलसेल साडी डेपो, द्वारकादास शामकुमार, काव्या डिझाईनर्सच्या संचालिका सुपर्णा अहिवळे, डॉ. मीरा मगर आदींचे विशेष सहकार्य राहणार आहे. या स्पर्धेत सहभागासाठी नाव नोंदणी आवश्‍यक आहे. सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुकांनी आपली नावनोंदणी सकाळ विभागीय कार्यालय, फलटण येथे किंवा 77740 50209 या भ्रमणध्वनीवर करावी. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मधुरांगणच्या सहसंयोजिका भारती शिंदे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dandiya Competition in Phaltan on occasion of Navratri Festival