esakal | बेळगावात यंदाही दांडियाच्या स्पर्धांना परवानगी नाही I Dandia
sakal

बोलून बातमी शोधा

Dandia

बेळगावात यंदाही दांडियाच्या स्पर्धांना परवानगी नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - नवरात्र म्हटलं की दांडियाचा खेळ आलाच. बेळगाव शहरासह परिसरात गेली दोन वर्षे कोरोनामुळे दांडिया स्पर्धा भरविण्यात आल्या नव्हत्या. यंदाही दांडीयाच्या स्पर्धांना पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. यामुळे दांडिया प्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे इच्छुकांना स्पर्धापासून दुरूच रहावे लागणार आहे. दांडीयाच्या स्पर्धा होणार नसल्या तरी गल्लीबोळात व गावागावात दांडियाचे मनोरंजनाचे कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

यंदा नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. ७) सुरुवात होणार आहे. यामुळे अवघ्या एक दिवसांवर नवरात्रोत्सव आला आहे. शुक्रवारी (ता.१५) विजयादशमीच्या कार्यक्रमांना याची सांगता होणार आहे. या नऊ दिवसांच्या कालावधीत शहरातील नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम आखले जातात. यामध्ये दांडिया कार्यक्रमांचाही समावेश असतो. दरवर्षी शगुन गार्डन, मिलेनियम गार्डन व शहरातील अनेक ठिकाणी दांडियाच्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. यासाठी मोठे बक्षिसही ठेवले जाते. तसेच हे पाहण्यासाठी गर्दीही होते. यामुळे गेली दोन वर्षे या कार्यक्रमावर बंदी होती. यंदाही या स्पर्धावर बंदी असणार आहे.

हेही वाचा: निपाणी : राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात दोन ठार

नवरात्रोत्सवानिमित्त शहर आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते. तसेच मंडपासमोरच दांडियाचा खेळ खेळला जातो. मात्र, कोरोनामुळे यावर बंधने आली आहेत. सलग तिसऱ्या वर्षी दांडियाचे कार्यक्रम होणार नसल्याने दांडिया प्रेमीतून नाराजी दिसून येत आहे. दांडिया खेळताना गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे याला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती मिळाली.

प्रतिक्रिया

कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अजूनही कोरोनाची भिती आहे. नवरात्रोत्सवात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे दांडियाच्या स्पर्धा भरविण्यास यंदाही परवानगी नसेल.

- विक्रम आमटे, पोलिस उपायुक्त

loading image
go to top