सांगलीत धोका वाढतोय; 35 नवे रुग्ण, 31 कोरोनामुक्त

शैलेश पेटकर
Thursday, 4 March 2021

आज दिवसात 35 जणांना कोरोनाचा बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील महापालिका क्षेत्रात 13 जणांना बाधा झाली आहे. पालिका क्षेत्रात धोका वाढत आहे. गेल्या अडीच महिन्यात उच्चांकी रुग्णसंख्या आज दिसून आली. 

सांगली : आज दिवसात 35 जणांना कोरोनाचा बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील महापालिका क्षेत्रात 13 जणांना बाधा झाली आहे. पालिका क्षेत्रात धोका वाढत आहे. गेल्या अडीच महिन्यात उच्चांकी रुग्णसंख्या आज दिसून आली. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. तसेच मास्कचा वापर अत्यावश्‍यक आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, दिवसांत 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 187 रुग्ण उपचाराखाली आहेत. 

आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 563 जणांचे स्वॅब तपासले. त्यात 25 जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 791 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 10 जण कोरोना बाधित आढळले. आज आढळलेल्या 17 कोरोना बाधित रुग्णांत आटपाडी तालुक्‍यात दहा रुग्ण आढळून आले आहेत. जत, कडेगाव, तासगाव तालुक्‍यात प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले आहे. तर खानापूर, मिरज आणि वाळवा तालुक्‍यात प्रत्येकी एक रुग्ण आहेत. कवठेमहांकाळ, पलूस आणि शिराळा तालुक्‍यात एकही रुग्ण आढळून आला नाही. 

महापालिका क्षेत्रात 13 जणांना बाधा झाली आहे. त्यापैकी सांगली शहरात नऊ, तर मिरज शहरात चार जणांना समावेश आहे. 31 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 187 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 48 जण चिंताजनक आहेत. 107 रुग्ण गृहअलगीकरणात आहेत. 77 जण रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील चित्र 
आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48573 
आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46625 
सध्या उपचार घेणारे रुग्ण- 187 
आजअखेर जिल्ह्यातील मृत्यू- 1761 
ग्रामीण भागातील रुग्ण- 24571 
शहरी भागातील रुग्ण- 7253 
महापालिका क्षेत्र रुग्ण- 16749 

कोरोना तालुकानिहाय स्थिती 
आटपाडी- 2519 
जत- 2351 
कडेगाव- 2969 
कवठे महांकाळ- 2493 
खानापूर- 3020 
मिरज- 4557 
पलूस- 2633 
शिराळा- 2301 
तासगाव- 3456 
वाळवा- 5525 
महापालिका- 16749 
एकूण - 48573 

 

 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger is increasing in Sangli; 35 new patients, 31 coronary free