esakal | हिंदूना नव्हे मोदींच्या सत्तेलाचा धोका

बोलून बातमी शोधा

congress meeting.jpg

हिंदूना नव्हे मोदींच्या सत्तेलाचा धोका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-देशात हिंदूना कधीच धोका नाही. परंतू निवडणुका जवळ आल्या की मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू खतरे मे है असे सांगून मतदारांची दिशाभूल करतात. परंतू मोदींची सत्ताच आता धोक्‍यात आली आहे. त्यांचा खोटारडेपणा प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांनी लोकांना सांगावा असे आवाहन प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रभारी तसेच अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे सचिव हरपाल सिंहजी यांनी येथे केले. 


जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीने कॉंग्रेस समितीसमोर आयोजित आढावा बैठक आणि पदग्रहण समारंभात ते बोलत होते. युवक कॉंग्रेसचे सह प्रभारी गौरव श्रीमाली, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मंगेश चव्हाण, इंद्रजीत साळुंखे, जयदीप शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


हरपाल सिंहजी म्हणाले, ""देशात निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना बेरोजगारी कमी करण्याचे आश्‍वासन दिले. परंतू ते पूर्ण केले नाही. महागाई वाढली आहे. शांतता खंडीत झाली आहे. मोदी आणि शहा म्हणजेच रंगा-बिल्ला यांच्या जोडीने आतापर्यंत मतदारांची दिशाभूलच केली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांड झाले. त्यानंतर वादग्रस्त एन्काऊंटर झाले. निवडणुका जवळ आल्या की त्यांना हिंदू खतरे मे है असे सांगितले जाते. परंतू या देशात हिंदूना कधीच धोका नाही. निवडणुका जवळ आल्या की मात्र धोका असल्याची जाणीव करून दिली जाते. दिल्लीमध्ये त्यांना सत्ता मिळवता आली नाही, त्यामुळे तिथे दंगे करण्याचे काम केले. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्याची भिती वाटते.'' 


ते पुढे म्हणाले, ""देशात गॅस, पेट्रोलचे दर वाढतच आहेत. जीडीपी कमी झाला आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे हे अपयश जनतेपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. तसेच कॉंग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले असल्याची जनतेला सांगितले पाहिजे. महागाईच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची गरज आहे. कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आता कामातून ओळख निर्माण करून पक्षाची ताकद वाढवली पाहिजे.'' 


मंगेश चव्हाण म्हणाले, ""युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आज येथे पदे देण्यात आली. या पदाच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजे. पेट्रोल, गॅस दरवाढ यासारख्या जनतेच्या प्रश्‍नांवर आवाज उठवला पाहिजे. युवक कॉंग्रेसने जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ही पदे दिली आहेत याची जाणीव ठेवावी.'' 
सह प्रभारी गौरव श्रीमाली, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. युवक कॉंग्रेसचे सुशिल गोतपागर, प्रमोद जाधव, योगेश राणे, सौरभ पाटील, जयदीप भोसले, रवी खराडे, सनी धोतरे आदी उपस्थित होते.