बळिराजा धरणाच्या  भिंतीला धोका ः वाचा कशामुळे 

untitled.png
untitled.png
Updated on

आळसंद (सांगली) : बलवडी भा. (ता. खानापूर ) येथील येरळा नदी पात्रातील बळीराजा स्मृतीधरणाजवळ बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. वाळू तस्कर करणार्यांवर तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे. सध्या येरळानदी पात्रात पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे नदीपात्रातील वाळू दुचाकीवरून बेसुमार वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

लोकसहभागातून उभालेल्या बळिराजा स्मृती धरणाच्या भिंतीजवळून वाळू उपसा सुरु आहे. आगामी काळात धरणाच्या भिंतीला धोका पोहोचवण्याचा संभव आहे. वाळू तस्कर करणा र्यांनी धरणाच्या भिंतीला नख लावण्याचा प्रकार केला आहे. नदीपात्रात करुन बळीराजा धरणाच्या भिंतीवर वाळूचा ढीग टाकला आहे. दुचाकीवरून वाळूची वाहतूक केली जाते. दुचाकीच्या एका खेपेला पाचशे रुपयेला विक्री केली जाते. तरुणाई वाळू च्या विक्रीत गुरफटून गेली आहे. 

मध्यतंरी वाळू उपसा करण्याच्या तरूणांच्या मारामारी झाली होती. स्थानिक लोकांनी वाळूची चोरून वाहतुक करणार्यांवर अटकाव करण्याचा प्रयत्न केला. वाळूची चोरी करणारे अरेरावी करतात. त्याला महसूल प्रशासनाने चाप लावावा . अशी मागणी आहे. 

येरळेच्या वाळूला आला सोन्याचा भाव 
येरळानदीतील वाळू बांधकामासाठी चांगल्या प्रतची म्हणून ओळखली जाते. येरळेच्या वाळूला सर्वाधिक मागणी आहे. लोक हवे तेवढे पैसे मोजून वाळू खरेदी करण्याची मानसिकता आहे. त्यामुळे वाळू तस्कर करणार्यांची चंगळ आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Almatti Hippargi Dam Water Storage
ethanol petrol causing bike engine problems
Forest Department leopard rescue operation
Chandoli Dam rainfall update today
Marathi News Esakal
www.esakal.com